Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»अडावद पोलिसांची गांजा शेतीवर धडक कारवाई; १७५ झाडे जप्त

क्राईम

अडावद पोलिसांची गांजा शेतीवर धडक कारवाई; १७५ झाडे जप्त

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 8, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | अडावद पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गांजा शेतीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत १७५ गांजाची झाडे जप्त केली आहेत. देवझिरी-देवगड परिसरातील जंगलात एका शेतामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती अडावद पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला.

पोलिसांनी पंचांसमक्ष शेताची पाहणी केली असता, शेतामध्ये गांजाची अवैध लागवड केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पंचनामा करण्यात आला. या कारवाईत लहान-मोठी अशी एकूण १७५ गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली.

या प्रकरणात देवसिंग रावल्या बारेला याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी हा मूळचा सिंदखेडी, ता. वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश येथील असून सध्या देवगड, अनेर नदीच्या किनारी, ता. चोपडा, जि. जळगाव येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि प्रशांत कंडारे यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणाचा पुढील तपास अडावद पोलीस करत असून, अवैध गांजा लागवडीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

पोलिसांची कामगिरी; १८ लाखांचे ९३ हरवलेले मोबाईल नागरिकांना परत!

October 29, 2026

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add