Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»यावलमध्ये दोन मुलांसह विवाहित महिलेचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

क्राईम

यावलमध्ये दोन मुलांसह विवाहित महिलेचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 17, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | यावल तालुक्यातील कोळवद परिसरातून दोन मुलांसह ३२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने यावल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिस नोंदीनुसार, माधुरी उमेश महाजन (वय ३२) या आपल्या दोन मुलांसह राहत होत्या. त्यांचा मोठा मुलगा विपुल (वय १३) तर लहान मुलगा कार्तिक (वय ६) आहे. काही कारणास्तव महिला आपल्या दोन्ही मुलांसह घरातून बाहेर गेल्यानंतर त्या पुन्हा घरी परतल्या नाहीत.

महिला आणि दोन्ही मुले बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, तिघांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर महिलेच्या पतीने यावल पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

अज्ञात व्यक्तीने महिलेला आणि तिच्या दोन्ही मुलांना फूस लावून अपहरण केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलिसांकडून सुरू असून, महिला आणि दोन्ही मुलांचा शोध घेतला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

वाळूमाफियांविरोधात प्रशासनाची धडक मोहीम: १६ ट्रॅक्टर, ८ डंपर, १ जेसीबीसह साहित्य जप्त

September 18, 2026

केळीला २,३०० रुपये क्विंटलचा भाव; शेतकऱ्याने टाळ-मृदुंगाच्या गजरात साजरा केला आनंद!

September 18, 2026

३० सप्टेंबरपूर्वी पीक पेऱ्यांची नोंदणी करा; रावेर तालुक्यात केवळ १४ हजार शेतकऱ्यांची नोंद

September 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add