Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मेहुणबारे पोलिसांची धडक कारवाई; यात्रेत मंगळसूत्र चोरणारी टोळी जेरबंद

क्राईम

मेहुणबारे पोलिसांची धडक कारवाई; यात्रेत मंगळसूत्र चोरणारी टोळी जेरबंद

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 19, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी | मेहुणबारे पोलिसांनी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन पुरुष आणि दोन महिला आरोपींना अटक, तर एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून तब्बल ८ लाख १६ हजार ८८२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना संशयितांबाबत गोपनीय माहिती मिळाली. संशयित जामधा फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी संशयित वाहन अडवून त्यामधील व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र, तीन मोबाईल फोन तसेच चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २४.२६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, तीन मोबाईल फोन आणि वाहनाचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेदरम्यान महिलांच्या गर्दीचा फायदा घेत मंगळसूत्र चोरी केली जात असल्याचा तपासात उलगडा झाला आहे. आरोपींनी यापूर्वी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. मेहुणबारे पोलिसांच्या या कारवाईमुळे यात्रांमध्ये महिलांच्या दागिन्यांना लक्ष्य करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई झाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add