जळगाव प्रतिनिधी | सामाजिक बांधिलकी जपत पिंप्राळा एवं परिसर माहेश्वरी सभा तसेच पिंप्राळा माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने रविवार, २० सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पिंप्राळा येथील भगिरथ सोमाणी विद्यालयात सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे.
गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या सामाजिक उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रक्तदान करा, जीवन वाचवा’ या संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात पिंप्राळा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिराच्या आयोजनासाठी डॉ. व्ही. के. सोमाणी, गोविंद सोमाणी, वितेश भदादा, हितेश मनुधने, मयूर सोमाणी, निखिल जाखेडे, निखिल मुंदाडा, सावित्री सोमाणी, संजय सोमाणी, मनकचंद झेवर, लक्ष्मीनारायण मंडोरा, नरेंद्र सोमाणी, भारती सोमाणी आणि सौ. सुनिता मनुधने यांचे योगदान लाभत आहे.
पिंप्राळा एवं परिसर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष वितेश भदादा आणि सचिव हितेश मनुधने यांनी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.



