Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जुन्या वादातून कुंसुंब्यात पतीवर जीवघेणा हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव

जुन्या वादातून कुंसुंब्यात पतीवर जीवघेणा हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 20, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जुन्या वादाच्या कारणावरून कुंसुंबा येथे एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन भूषण पाटील (वय २६, व्यवसाय गृहिणी, रा. समर्थ शाळेजवळ, कुंसुंबा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. १९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कांचन व त्यांचे पती घरी असताना संशयित स्वप्नील राजेंद्र पाटील (वय २३) व धिरज संतोष खंडाळकर (वय २३), दोघेही रा. कुंसुंबा, हे त्यांच्या घरी आले.

जुन्या वादाच्या कारणावरून संशयित स्वप्नील याचा कांचन यांच्या पतीसोबत वाद झाला. त्यानंतर स्वप्नीलने शिवीगाळ करत कटर व काठीने मानेवर, नाकावर आणि कपाळावर वार करून गंभीर दुखापत केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यावेळी धिरज यानेही स्वप्नीलला अडविण्याऐवजी त्याची साथ देत वाद घातल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच स्वप्नीलने कांचन यांच्या पतीला जिवंत सोडणार नसल्याची धमकी दिल्याचेही पोलिसांत नोंदविण्यात आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add