Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»कॅनडात गणेशोत्सवातून भारतीय संस्कृतीचा जागर; मानवसेवा तीर्थासाठी ६१ हजारांची मदत

जळगाव

कॅनडात गणेशोत्सवातून भारतीय संस्कृतीचा जागर; मानवसेवा तीर्थासाठी ६१ हजारांची मदत

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 24, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

यावल प्रतिनिधी : परदेशात वास्तव्यास असतानाही भारतीय संस्कृती, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श यावल शहरातील सागर श्रीराम बडगुजर व सौ. गायत्री सागर बडगुजर या दाम्पत्याने कायम ठेवला आहे. कॅनडातील आपल्या निवासस्थानी दरवर्षी गणेशोत्सव साजरा करताना त्यांनी यंदाही गणेशोत्सवाला मानवसेवेची जोड दिली.

गणेशोत्सवानिमित्त १९ सप्टेंबर २०२६ रोजी कॅनडात अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे २२० जणांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांनी भेटवस्तू, मिठाई किंवा इतर वस्तू देण्याऐवजी सेवाभावी कार्यासाठी आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन बडगुजर दाम्पत्याने केले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, यंदा तब्बल ६१ हजार रुपये निधी जमा झाला.

ही रक्कम भारतात त्यांचे वडील प्रा. श्रीराम जानकीराम बडगुजर यांच्याकडे पाठविण्यात येते. त्यांच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रमांसाठी या निधीचा उपयोग केला जातो. मागील वर्षीही अनाथालय, वृद्धाश्रम तसेच मतिमंदांच्या संस्थांमध्ये अन्नदान आणि विविध सेवाकार्य करण्यात आले होते.

यंदा जमा झालेल्या ६१ हजार रुपयांचा उपयोग चोपडा तालुक्यातील वेले येथील ‘मानव सेवा तीर्थ’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून बेवारस मनोरुग्णांच्या उपचार व पुनर्वसनासाठी करण्यात येणार आहे.

परदेशात राहूनही भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासोबतच ‘सेवा हीच खरी भक्ती’ हा विचार कृतीतून साकारण्याचा बडगुजर दाम्पत्याचा हा उपक्रम गणेशोत्सवाला सामाजिक संवेदनशीलतेची नवी दिशा देणारा ठरला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add