Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»गुन्ह्यात अटक न करण्यासाठी एक लाखांची मागणी; एक जण एसीबीच्या जाळ्यात

क्राईम

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी एक लाखांची मागणी; एक जण एसीबीच्या जाळ्यात

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 29, 2026Updated:September 29, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पैशांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या प्रकरणी अमन जसबिंदर सनसोये वय ३६ वर्षे, रा. दीप नगर, भुसावळ या खासगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ACBच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार, तक्रारदार आणि अन्य तीन जणांविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदारासह अन्य तीन जणांकडून प्रत्येकी २५ हजार रुपये, म्हणजेच एकूण एक लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार ACBकडे करण्यात आली होती.

या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. प्रकरणात आरोपी म्हणून अमन जसबिंदर सनसोये याचे नाव नमूद करण्यात आले असून, त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक हेमंत नागरे हे सापळा अधिकारी असून, पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर हे पर्यवेक्षक अधिकारी आहेत. पोलीस नाईक, पोलीस हवालदार आणि इतर पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add