Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

जळगाव

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटने’तर्फे मानवंदना

Editorial DeskBy Editorial DeskOctober 3, 2026Updated:October 3, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.

महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, स्वच्छता, सामाजिक समता आणि शांततेचा संदेश देत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तर लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श देशासमोर ठेवला. ‘जय जवान, जय किसान’ हा त्यांचा संदेश आजही देशासाठी प्रेरणादायी आहे. या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला उपस्थितांनी अभिवादन केले.

या प्रसंगी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, संस्थापक महासचिव भगवान सोनार, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुमित देशमुख, जिल्हा संघटक अभिजीत पाटील, जळगाव शहराध्यक्ष जितेंद्र कोतवाल, जळगाव शहर सचिव योगेश चौधरी, जळगाव ग्रामीण सचिव योगेश सुने यांच्यासह संघटनेचे सदस्य विकास पाथरे, विकास चव्हाण, लालचंद अहिरे, किशोर शिंपी आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकारिता क्षेत्रातून समाजात सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही मूल्ये रुजविण्याची गरज व्यक्त करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसेच्या विचारांसोबतच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श पत्रकारांनी आपल्या कार्यातून जपावा, असे उपस्थितांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या देशसेवेच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रसेवा या मूल्यांना पत्रकारितेच्या माध्यमातून बळ देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add