Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»टाकळी फाट्याजवळ कंटेनरची दुचाकीला धडक; तरुण जागीच ठार

क्राईम

टाकळी फाट्याजवळ कंटेनरची दुचाकीला धडक; तरुण जागीच ठार

Editorial DeskBy Editorial DeskOctober 5, 2026Updated:October 5, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी येणाऱ्या बहिणीला घेण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ललित मनोहर झवर (वय ३०, मूळ रा. पाळधी, ता. धरणगाव, ह.मु. प्रेमनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी (४ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास जळगाव बायपासवरील टाकळी फाट्याजवळ हा अपघात झाला.

ललित झवर हे विमा एजंट म्हणून काम करत होते. त्यांच्या आजोबांचे ५ ऑक्टोबर रोजी वर्षश्राद्ध असल्याने कुटुंबीय पाळधी येथे मूळ गावी गेले होते. वर्षश्राद्धासाठी ललित यांची बहीण येणार असल्याने तिला घेण्यासाठी ते दुचाकीवरून जळगाव रेल्वे स्थानकाकडे निघाले होते.

पाळधीहून बायपासमार्गे जळगावकडे येत असताना टाकळी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. धडकेमुळे ललित हे रस्त्यावर फेकले गेले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने रुग्णालयात धाव घेतली. ललित यांच्या अकाली मृत्यूने झवर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एकुलत्या एक मुलाच्या अचानक जाण्याने कुटुंबाचा आधारच हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add