Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»रावेर तालुक्यात २४ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; केऱ्हाडा गावात खळबळ

क्राईम

रावेर तालुक्यात २४ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; केऱ्हाडा गावात खळबळ

Editorial DeskBy Editorial DeskOctober 7, 2026Updated:October 7, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

रावेर प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील केऱ्हाडा गावातील इंदिरानगर परिसरात २४ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेंद्र रवींद्र कापडे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र कापडे आणि रामसिंग भिल्ल यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. याचवेळी संतापाच्या भरात रामसिंग भिल्ल याने ब्लेंडर मशीनच्या कटरने राजेंद्र यांच्या गळ्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात राजेंद्र कापडे गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर त्यांना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणी संशयित रामसिंग भिल्ल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून नेमका कोणत्या कारणातून झाला, वादाचे मूळ काय होते आणि हत्येमागे आणखी काही कारण आहे का, याचा तपास रावेर पोलीस करत आहेत. पुढील तपासात या घटनेचे संपूर्ण कारण स्पष्ट होणार आहे.

crime crime news Jalgaon jalgaon corporation Jalgaon crime jalgaon news
Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add