Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»बसस्थानकात दागिने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन महिलांसह पाच संशयितांना अटक, १० ग्रॅम सोने जप्त!

क्राईम

बसस्थानकात दागिने चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोन महिलांसह पाच संशयितांना अटक, १० ग्रॅम सोने जप्त!

Editorial DeskBy Editorial DeskOctober 23, 2026Updated:October 23, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा चाळीसगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन महिलांसह पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफावरही पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.

चाळीसगाव बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असताना एका महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरीला गेले होते. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. बसस्थानक परिसरातील हालचाली, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला.

तपासादरम्यान दोन महिलांसह पाच संशयितांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले आहे. तसेच चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफाचीही चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

बसस्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रवासादरम्यान महिलांनी आपल्या गळ्यातील दागिने, पर्स आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add