Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

क्राईम

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव! आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Editorial DeskBy Editorial DeskOctober 28, 2026Updated:October 28, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांची मालिका सुरूच असून, पाळधी रेल्वे पुलावर आयशर मालवाहू वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत योगेश गजमल राक्षे या तरुणाचा मृत्यू झाला. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या योगेश यांच्या मृत्यूमुळे राक्षे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

योगेश राक्षे हे आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम करत होते. दुचाकीवरून घरी जात असताना पाळधी रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, ३० जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव धसल्यानंतर बायपासवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे अवजड वाहतूक शहरातून वळवण्यात आली. या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गांवरील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जुलैपासून आतापर्यंत या मार्गावरील अपघातांत २५ घटनांची नोंद झाली असून, त्यामध्ये १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या अपघातप्रकरणी पोलिसांनी आयशर वाहनचालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले आहे. या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे महापौर यांचे निर्देश

October 28, 2026

हेडगेवार नगरातील घरफोडीचा उलगडा; तीन चोरट्यांना अटक

October 28, 2026

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add