Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आ. सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश !

जळगाव

जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आ. सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश !

Editorial DeskBy Editorial DeskNovember 6, 2026Updated:November 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहराच्या मूलभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत जळगाव महानगरपालिकेला १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ‘महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद’ या योजनेंतर्गत हा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, यासंदर्भातील शासन निर्णय ५ नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

शहरातील विविध भागांमध्ये विकासकामे करण्यासाठी निधी मिळावा, यासाठी आ.सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर जळगाव शहरासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीतून शहरातील सर्व १९ प्रभागांमध्ये विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. तसेच शहराच्या प्रमुख प्रवेशमार्गांवर आधुनिक प्रकाशव्यवस्था उभारण्यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत भागांमधील नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्यासोबतच प्रमुख रस्त्यांवरील रात्रीची वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

शहरातील प्रत्येक प्रभागाचा समतोल विकास, दर्जेदार रस्ते आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय शहरातील प्रलंबित रस्ते विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आमदार भोळे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जळगाव शहराच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सुरेश भोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री संजय सावकारे यांचे आभार व्यक्त केले.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही शासनाकडून अधिकाधिक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भूमिका आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

किरकोळ कारणावरून बेदम मारहाण; लोखंडी पावडीने डोक्यावर वार, दोघांविरुद्ध गुन्हा

November 8, 2026

महिलेचा विनयभंग; अश्लील हातवारे करत शिवीगाळ आणि धमकी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

November 8, 2026

दिवाळीच्या मुहूर्तावर जळगावचा सराफा बाजार फुलला! सोने-चांदीच्या मूर्ती आणि नाण्यांना ग्राहकांची मोठी पसंती

November 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add