Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»महिलेचा विनयभंग; अश्लील हातवारे करत शिवीगाळ आणि धमकी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

क्राईम

महिलेचा विनयभंग; अश्लील हातवारे करत शिवीगाळ आणि धमकी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल!

Editorial DeskBy Editorial DeskNovember 8, 2026Updated:November 8, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जामनेर प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला अश्लील हातवारे करून सोबत चालण्याचा इशारा देत तिच्यासह कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे सात वाजेच्या दरम्यान गावातील संशयित आरोपी नवनाथ प्रकाश भुतेकर आणि प्रमिलाबाई प्रकाश भुतेकर यांनी महिलेकडे अश्लील हातवारे करून तिला सोबत चालण्याचा इशारा केला.

यावेळी संशयितांनी पीडित महिला तसेच तिचे पती, सासू आणि सासरे यांना शिवीगाळ केली. तसेच महिलेला मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार केल्यास आम्ही फाशी घेऊ किंवा विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करू आणि त्यासाठी तुमचे नाव सांगू, अशी धमकीही संशयितांनी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नवनाथ भुतेकर आणि प्रमिलाबाई भुतेकर या दोघांविरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पहूर पोलीस करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

किरकोळ कारणावरून बेदम मारहाण; लोखंडी पावडीने डोक्यावर वार, दोघांविरुद्ध गुन्हा

November 8, 2026

दिवाळीच्या मुहूर्तावर जळगावचा सराफा बाजार फुलला! सोने-चांदीच्या मूर्ती आणि नाण्यांना ग्राहकांची मोठी पसंती

November 8, 2026

जळगाव शहराच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आ. सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश !

November 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add