Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»अजंठा चौफुली मित्र मंडळातर्फे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अश्रूंनी निरोप, दीपप्रज्वलनातून श्रद्धांजली

जळगाव

अजंठा चौफुली मित्र मंडळातर्फे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना अश्रूंनी निरोप, दीपप्रज्वलनातून श्रद्धांजली

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 31, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

अजंठा चौफुली मित्र मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित दादा पवार यांच्या निधनानिमित्त अजंठा चौफुली मित्र मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी स्व. अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमस्थळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली वाहिली. दीपप्रज्वलनाच्या प्रकाशात संपूर्ण परिसर भावूक झाला होता. उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात आदर व कृतज्ञतेची भावना दिसून येत होती.

स्व. अजित दादा पवार यांनी आपल्या कार्यकाळात सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली, असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीसाठी प्रेरणादायी राहील, अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

या श्रद्धांजली कार्यक्रमास

नंदू आप्पा पाटील, कुणाल पाटील, विकी सोनवणे, गजेंद्र राजपूत, जितेंद्र चौथे, पिंटू गुप्ता, दीपंकर भालेराव, जसवंत राजपूत, विकी सपकाळे, चेतन जैन, सुरज बिराडे, किशोर पाटील, अक्षय बिराडे, गिरीश पाटील, शंकर बिराडे, किरण माळी, अविनाश पाटील, रुपेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

अजंठा चौफुली मित्र मंडळातर्फे आयोजित या श्रद्धांजली कार्यक्रमातून स्व. अजित दादा पवार यांच्याप्रती आदरांजली अर्पण करण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add