Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»‘रस्ता सुरक्षा सप्ताहा’निमित्त जळगावात पोलिसांची भव्य हेल्मेट रॅली

जळगाव

‘रस्ता सुरक्षा सप्ताहा’निमित्त जळगावात पोलिसांची भव्य हेल्मेट रॅली

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 1, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

१६० पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग; ‘आधी स्वतः शिस्त’चा दिला ठाम संदेश

जळगाव प्रतिनिधी : शहरात सुरू असलेल्या *‘रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६’*च्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे शुक्रवारी सायंकाळी भव्य दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा व सुरक्षित प्रवासाचे नियम पाळावेत, या उद्देशाने काढण्यात आलेल्या या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली ही रॅली आयोजित करण्यात आली होती. “आधी स्वतः शिस्त, मग इतरांना धडा” या भूमिकेतून रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने हेल्मेट परिधान करून नागरिकांसमोर आदर्श ठेवला. शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी सुमारे ४ वाजता पोलिस मुख्यालयातून या रॅलीला प्रारंभ झाला.

या रॅलीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे १६० पोलीस अंमलदार आपल्या दुचाकींसह सहभागी झाले होते. पोलिस मुख्यालयातून डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, गाडगे बाबा चौक मार्गे रॅली महाबळ चौक येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर शिस्तबद्धपणे मार्गक्रमण करणाऱ्या या पोलीस ताफ्यामुळे नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले.

रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखणे, दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर अनिवार्य असल्याची जाणीव निर्माण करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करणे, हा या हेल्मेट रॅलीचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add