Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»चोपडा शहरातील नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून सुटला नागरी समस्यांचा तिढा

राजकारण

चोपडा शहरातील नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून सुटला नागरी समस्यांचा तिढा

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 16, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

नाविन्यपूर्ण सुविधा नगराध्यक्ष नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नुकतीच उपलब्ध करून देण्यात आली

चोपडा शहरात नगरपालिकेमार्फत नगरवासीयांना दिवाबत्ती व स्वच्छतेविषयी ताबडतोब सेवा मिळावी, या मुख्य उद्देशासाठी व्हाट्सअ‍ॅप नंबरची नाविन्यपूर्ण सुविधा नगराध्यक्ष नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नुकतीच उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत स्वच्छता विभागाकडील एकूण 105 प्राप्त तक्रारींतून 65 तक्रारींचे तर विद्युत विभागाकडील प्राप्त  244 तक्रारीपैकी  204 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.

चोपडा नगरपरिषद शहरातील नागरिकांना नियमितपणे विविध नागरी सुविधा तत्परतेने पुरविण्याचे काम करीत आहे.

यामध्ये स्वच्छता, विद्युत विभाग (स्ट्रीट लाईट) विभागाशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी विविध माध्यमांतून नगरपरिषदेस प्राप्त होत असतात. मात्र, अनेक वेळा नागरिकांना नगरपरिषदेच्या कोणत्या अधिकारी किंवा कर्मचार्‍याशी, तसेच कोणत्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, याबाबत संभ्रम निर्माण होत असतो. त्यामुळे तक्रारींच्या निवारणास विलंब होत होता.

परिणामी नागरिकांची हेळसांड होत असल्याचे निदर्शनास आल्याने नगराध्यक्षा नम्रता पाटील व मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या संकल्पनेतून स्वच्छता विभाग व विद्युत विभागासाठी स्वतंत्र भ्रमणध्वनी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तसेच तक्रार निवारणासाठी स्वतंत्र व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक निश्चित केला आहे.

या माध्यमातून आता नागरिकांना घरबसल्या तक्रारी करता येत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप संदेशाद्वारे आतापर्यंत स्वच्छता विभाग व विद्युत विभागाकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात स्वच्छता विभागात प्राप्त तक्रारींचा गोषवारा असा की, व्हॉट्सअ‍ॅप तक्रारी 52, तर 31 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. आता प्रलंबित 21 तक्रारी शिल्‍लक राहिल्या आहेत. रजिस्टर तक्रारीं 53 आलेल्या असून 34 निकाली काढल्या. तर 19 प्रलंबित आहेत.

विद्युत विभागात व्हॉट्सअ‍ॅपवरून 49 तक्रारी प्राप्‍त झाल्या असून 40 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. 9 तक्रारी प्रलंबित आहेत. जनरल तक्रारी 195 असून 164 तक्रारी निकाली काढल्या. 31 तक्रारी प्रलंबित आहेत.

स्वच्छता विभाग व विद्युत विभागामार्फत 24 तासाच्या आत तक्रारीचे निवारण करण्यात येत आहे. परंतु प्रलंबित तक्रारी काही कारणास्तव प्रलंबित आहेत. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ व प्रभावी निराकरण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी दिली आहे. तक्रार निवारण तात्काळ होत असल्यामुळे नागरिक देखील समाधान व्यक्त करीत आहे.

तक्रारींसाठी या भ्रमणध्वनीवर करा संपर्क

स्वच्छता विभाग तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक (7821989533) व विद्युत (दिवाबत्ती) विभाग तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक (9529296921) यावर तक्रार करावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add