अल्पमतातील भुसावळ पालिकेची पहिली सभा गाजली भुसावळ नगरपालिकेची पहिली जनरल मीटिंग 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. 50 नगरसेवकांच्या भुसावळ नगरपालिकेत भाजपचे 27 नगरसेवक असून शिवसेना 2 काँग्रेस 3 , अपक्ष 4 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 उमेदवार आहेत. गायत्री भंगाळे अध्यक्ष असलेल्या शरद पवार गटाचे बारा उमेदवार असून त्या अल्पमतातील नगराध्यक्षा आहेत. अल्पमतातील नगराध्यक्ष असलेल्या गायत्री भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा पार पडली. त्यात एकूण 250 विषय विषय पत्रिकेवर होते. बाकी ऐनवेळी आयत्याचे दोन विषय आले. एकूण 250 पैकी 170 विषयांच्या संदर्भात वाद निर्माण झाले. म्हणजे भाजप तर्फे 170 विषयांना विरोध केला. या विषयांसंदर्भात एक तर मतदान घ्या किंवा…
Author: Editorial Desk
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मंत्री नितेश राणे हे उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वरळी डोम इथं कार्यक्रम झाला. त्यात सलमान खान याच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली. याच कार्यक्रमावरून नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना मोठा टोला लगावला आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील यशानंतरही त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांच्या वक्तव्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानने उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली. उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान जास्त हिंदू निघाला. राहुल गांधींसमोर उद्धव…
पिंपळगाव हरेश्वर येथील तरुणांचा संशोधनात समावेश : बंजारा समाजाच्या भटक्या जीवनशैलीवर नव्याने प्रकाश पिंपळगाव हरे. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड-लोहारा रस्त्यावरील म्हसास तांडा येथे अप्रकाशित हिंदी शिलालेख आढळून आला आहे. त्याचे वाचन करून अर्थ लावल्याने मध्यप्रदेश-महाराष्ट्र सबंध व बंजारा समाजाच्या भटक्या जीवनशैलीवर नव्याने प्रकाश पडला आहे. पिंपळगाव हरेश्वर येथील वन्यजीव संशोधक व इतिहासप्रेमी विवेक वाघे, नरेंद्र देशमुख व लातूर येथील इतिहास संशोधक कृष्णा गुदडे यांनी या शिलालेखाचे वाचन करून शिलालेखात उल्लेख असलेल्या राठोड कुटुंबीयांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा धांडोळा घेतला आहे. सदर शिलालेख ब्रिटिशकालीन असून त्याची तारीख पिल्ले जंत्रीनुसार 12 जुलै 1916 येत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘म्हसास तांडा’ मुळच्या भटक्या असलेल्या बंजारा समाजातील राठोड…
सोलर वीज मीटर ग्राहकांना नियमित वीज बिल द्या! ग्राहक पंचायत महाराष्ट्रची ठाम मागणी चंद्रपूर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावती, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने दि. ०९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, भद्रावती कार्यालयास निवेदन देऊन सोलर वीज मीटरधारक ग्राहकांना नियमित व वेळेवर वीज बिल वितरित करण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी भद्रावती शहरातील गौतम नगर परिसरातील सोलर वीज मीटर ग्राहकांना ऑगस्ट २०२५ पासून वीज बिल मिळाले नसल्याच्या तक्रारी ग्राहक पंचायतकडे प्राप्त झाल्या होत्या. दीर्घकाळ बिल न मिळाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम व आर्थिक ताण निर्माण होत असल्याची बाब संघटनेने निदर्शनास आणून दिली. या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायतने उपकार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात सप्टेंबर…
नागरिकांचा सवाल : जळगाव शहरात समस्यांचा डोंगर जळगाव : महानगरपालिका निवडणूक होवून महायुतीने सत्तेचा सोपान देखील गाठला आहे. महापौर, उपमहापौरांची निवड झाली असून प्रशासकीय राजवट संपुष्टात येसून राजकीय कार्यकिर्द सुरु झाली आहे. निवडणूक काळात जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तत: कधी व कशी होते याची जळगावकर आतुरतेने वाट पहात आहेत. शहरातील अनेक प्रभागात समस्यांचा डोंगर कायम असून समस्या सोडविण्यासाठी कारभारी केव्हा कामाला लागणार याचीच चर्चा रंगत आहे. अनेक प्रभागात मुलभूत समस्यांचे निराकरण करतांना मनपाने हात आखडता घेतला आहे. मनपा क्षेत्रातील बहुतांश व्यापारी संकुल, मार्केट, हमरस्ते अतिक्रमण, घाणीचे साम्राज्य याने त्रस्त असून गटारींची अवस्था अतिशय वार्इट झालेली आहे. रस्त्यांची दुरावस्था वाहनचालकांच्या जीवावर उठली…
पत्रकार सरंक्षण संघटनेचे मिलिंद सोनवणे यांची तक्रार ! भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ शहरातील वाल्मिक चौक ते अप्सरा चौक दरम्यान सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामात गंभीर त्रुटी व प्रशासकीय मान्यतेचा भंग असल्याचा आरोप करत सोनवणे यांची सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित काम प्रशासकीय मान्यतेनुसार व तांत्रिक निकषांनुसार न होता घाईघाईने व नियमबाह्य पद्धतीने केले जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या कारणाने पुन्हा हा रस्ता चर्चेत आला आहे . सार्वजनिक बांधकाम मार्फत सदर रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात रस्त्याचे कामा मध्ये अनियमितता दिसून येत असल्याचे सोनवणे यांचे म्हणणे आहे. सुरक्षितता उपाययोजना अथवा तांत्रिक देखरेख नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे…
अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५’ या राज्यस्तरीय सौंदर्य व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग जळगाव ( प्रतिनिधी ) – अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘मिस प्राईड ऑफ महाराष्ट्र – सीझन ५’ या राज्यस्तरीय सौंदर्य व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थिनी कु. आकांक्षा डोंगरे हिची मिस कॅटगरीमध्ये फायनलिस्ट म्हणून निवड झाली आहे. कु. आकांक्षा डोंगरे सध्या बी.एससी. नर्सिंग (सातवा सेमिस्टर) मध्ये शिक्षण घेत असून, अभ्यासासोबतच तिने या स्पर्धेसाठी विशेष तयारी केली. शारीरिक तंदुरुस्ती, फिटनेस, व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिने नियमित सराव करत जिमचे प्रशिक्षण घेतले. सातत्यपूर्ण मेहनत,…
171 जागांसाठी 1200 हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी असून उद्यापासून जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होत आहे. एकूण 171 जागांसाठी 1200 हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, या भरती प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. या भरती प्रक्रियेत 118 पुरुष उमेदवारांसाठी तर 53 महिला उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उमेदवारांची निवड पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावी, यासाठी यंदा डिजिटल टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे.पोलीस भरतीदरम्यान मानवी चुका टाळण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबवली जाणार असून, उमेदवारांची नोंद, चाचण्या आणि मोजमाप यामध्ये तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. तसेच भरती…
देशाच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञ, वैज्ञानिक घडावेत : अशोक जैन जळगाव : समाजाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक, संशोधक, डॉक्टर, अभियंते आणि नवोन्मेषक घडवणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांच्या मांध्यमातून भावी शास्त्रज्ञ, संशोधक घडत असतात, त्यामुळे अनुभूती स्कूलमध्ये असे उपक्रम आवर्जून राबविले जातात असे मत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले. अनुभूती निवासी स्कूलच्या 14 व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्घाटनाच्या औपचारिक कार्यक्रमास अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, स्कूलचे प्राचार्य देबासीस दास, स्कूलचे सायन्स टिचर यू.व्ही. राव तसेच अनुभूती निवासी शाळेसह अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, काशिनाथ पलोड इंग्लिश मिडीयम स्कूल, एल. एच. पाटील…
जळगाव, धरणगाव-अमळनेरमार्गे विशेष गाडी धावणार जळगाव । राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्यामजी येथे दर्शनासाठी जाणाचा प्लॅन करणाऱ्या जळगाव जिल्ह्यासह खान्देशातील भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने काकीनाडा–हिसार–काकीनाडा दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यात भुसावळसह जळगाव, धरणगाव आणि अमळनेर स्थानकावर या विशेष रेल्वे गाडीला थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणाऱ्या जिल्ह्यासह खान्देशातील भाविकांसाठी ही विशेष गाडी वरदान ठरणार असून, आगामी काळात अशाच आणखी सुविधांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. गाडी क्रमांक ०७७०५ ही विशेष गाडी १८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत धावणार आहे. ही गाडी काकीनाडा येथून गुरुवारी सकाळी ५ वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी…

