Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»अनुभूती निवासी स्कूलमध्ये दोन दिवसांच्या विज्ञान प्रदर्शन

जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये दोन दिवसांच्या विज्ञान प्रदर्शन

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 10, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

देशाच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञ, वैज्ञानिक घडावेत : अशोक जैन

जळगाव : समाजाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक, संशोधक, डॉक्टर, अभियंते आणि नवोन्मेषक घडवणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांच्या मांध्यमातून भावी शास्त्रज्ञ, संशोधक घडत असतात, त्यामुळे अनुभूती स्कूलमध्ये असे उपक्रम आवर्जून राबविले जातात असे मत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केले.

अनुभूती निवासी स्कूलच्या 14 व्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उद्घाटनाच्या औपचारिक कार्यक्रमास अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, स्कूलचे प्राचार्य देबासीस दास, स्कूलचे सायन्स टिचर यू.व्ही. राव तसेच अनुभूती निवासी शाळेसह अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल, काशिनाथ पलोड इंग्लिश मिडीयम स्कूल, एल. एच. पाटील इंग्लिश स्कूल, चावरा इंटनॅशनल स्कूल चोपडा तसेच द वर्ल्ड स्कूल भुसावळ येथील विद्यार्थी व शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे प्रदर्शन केवळ विज्ञानाचे दर्शन नसून जिज्ञासा, प्रश्न विचारण्याचे धैर्य आणि शोध घेण्याच्या संयमाची अनुभूती देणारे होय. या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना निरीक्षण, विचार आणि संवेदनशीलतेने जग समजून घेण्याची संधी मिळत आहे. स्कूलचे संस्थापक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांचा शिक्षणाबाबतचा दृष्टिकोन पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाणारा होता. अनुभवातून शिकणे, मूल्यांची जोपासना आणि अर्थपूर्ण विकास यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आजचे विज्ञान प्रदर्शन हे त्यांच्या स्वप्नाचे जिवंत प्रतिबिंब असल्याचे विद्यार्थ्यांनी मांडलेल्या त्यांच्या मॉडेल्सवरून दिसते. यामध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनतीने व कल्पक पद्धतीने आपले प्रयोग, मॉडेल्स सादर केलेले आहेत. त्यात रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता व विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रयोग व मॉडेल्स सादर केली. डॉ. सी. व्ही. रामन यांच्या ‘रामन इफेक्ट’ या ऐतिहासिक संशोधनाची माहिती देत विज्ञान दिन साजरा करण्यामागील उद्देश यू.व्ही. राव यांनी सांगितला.

या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानातील सर्जनशीलता आणि संशोधनवृत्तीचे प्रभावी दर्शन घडवले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्रेन, गॅलेक्सी गेटवे, ग्रीनहाऊस शेती, सोलार-आधारित मॉडेल्स, मानवी डोळ्याची रचना, न्यूरोसायन्स, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवइंधन, हायड्रोजेल, जनुकशास्त्र, मायक्रोस्कोपिक विश्व, मंगळ कक्षीय मोहीम यांसह एकूण 50 हून अधिक प्रयोग व कार्यरत मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. पर्यावरण संवर्धन, शाश्वत ऊर्जा, आरोग्य, कृषी व दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाय सुचवणार्‍या या प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी संकल्पना स्पष्ट मांडत प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञानाची उपयुक्तता पटवून दिली, त्यामुळे प्रदर्शन ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add