Author: Editorial Desk

नशिराबादच्या आजीबाईंचा ऐतिहासिक विजय, जळगाव : नशिराबाद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ चुरशीची ठरली; परंतु याहूनही अधिक चर्चा वयाच्या ७७ व्या वर्षी राजकारणात पदार्पण करून विजय मिळवणाऱ्या आजीबाई जनाबाई रंधे यांची होत आहे. विशेषतः ज्या वयात अनेकजण निवृत्त आयुष्याचा विचार करतात, त्या वयात जनाबाई रंधे यांनी नगरपंचायत निवडणुकीत विजय मिळवत इतिहास घडवला आहे. नशिराबाद नगरपंचायत निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ ‘अ’ मधून भाजपकडून निवडणूक लढवलेल्या जनाबाई रंधे यांनी कडक उन्हात, पायात चप्पलही उ घालता प्रचार केला. ना हातात काठी, ना शरीराची तक्रार. खरं तर तरुणांनाही लाजवेल असा त्यांचा उत्साह पाहून मतदार प्रभावित झाले. घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला आणि विकासाची ग्वाही…

Read More

धुक्यामुळे रेल्वेच्या गतीला ब्रेक! उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेगाला ब्रेक लागला असून दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून भुसावळ मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. यामुळे प्रवाशांचेही वेळापत्रक गडबडले असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिल्लीकडून येणाऱ्या बहुतांश गाड्या सोमवारी (दि. २२) २ ते १३ तास उशीराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल होता आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे. धुक्यामुळे रेल्वे गाड्याचा वेग मंदावला आहे. दिल्ली, पंजाब पंजाब आणि उत्तर प्रदेशात दृश्यमानता ५० मीटरपेक्षा कमी झाल्याने रेल्वेच्या वेगावर मर्यादा आल्या आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून लोको पायलटला गाड्या संथ गतीने चालवाव्या लागता आहे. त्यामुळे…

Read More

29 महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज २३ डिसेंबपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची खऱ्या अर्थाने धावपळ सुरु होणार असून राजकीय वातावरण तापले आहे. जळगावसह राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे आज 23 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज दाखल येणार आहेत. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करून अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 2 जानेवारी रोजी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक…

Read More

चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक नशिराबाद रस्त्यावरील चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन फेकली गेली. याच वेळी एअर बॅग उघडल्याने चालक व त्याच्या बाजूला बसलेला प्रवासी थोडक्यात बचावला. या अपघातात कारमधील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जीएमसीत दाखल करण्यात आले आहे.तर मालवाहू वाहन रस्त्यावरील दुभाजकावर चढले. या घटनेबाबत असे की, भुसावळकडून जळगावकडे मारुती बलेनो चारचाकी (क्रमांक एमएच-१९, सीव्ही ६३८७) येत होती. तर महेंद्र पिकअप मालवाहू वाहन जळगावकडून अमरावतीकडे खजूर घेऊन जात होते. चिरमाडे पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. यात…

Read More

मुक्ताईनगरमध्ये कोथळी गावाजवळ घडली घटना मुक्ताईनगर प्रतिनिधी : एसटी बस थांबवली नाही या क्षुल्लक कारणावरून मुक्ताईनगर आगाराच्या बस चालकाला अडवून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, गुंडगिरी करत आरोपींनी चालकाला पाय धरून आणि नाक घासून माफी मागण्यास भाग पाडले. या धक्कादायक घटनेमुळे एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. फिर्यादी जीवन सुभाष सुरवाडे (वय ३५, रा. कुन्हा, ता. भुसावळ) हे मुक्ताईनगर आगारात बस चालक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी, १९ डिसेंबर रोजी ते फैजपूर ते मुक्ताईनगर या मार्गावर प्रवाशांना घेऊन बस (सावदा-उदळी-चिंचोली-चांगदेव मार्गे) जात होते. संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास वढवे फाटा ते हरताळा फाटा दरम्यान आरोपींनी बसला…

Read More

मुक्ताईनगरमध्ये आमदार चंद्रकांत पाटलांची कन्या विजयी जळगाव : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मुक्ताईनगर नगर परिषदेचा निकाल अखेर हाती आला आहे. मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना मोठी धक्का बसला असून, नगराध्यक्षा पदासाठी रिंगणात उतरलेल्या आमदार चंद्रकांत पाटलांची कन्या संजना पाटील यांचा 2561 मतांनी विजय झाला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यासह सासरे एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुक्ताईनगर नगर परिषदेच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील यांचा विजय झाल्यानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरम्यान, मुक्ताईनगरच्या जनतेने खरी गुंडागिरी ही मतदानाच्या माध्यमातून नष्ट केली आहे. आमदार एकनाथ…

Read More

मुलीला पळवून नेल्याच्या रागातून जाळपोळ पारोळा तालुक्यातील कन्हेरे गावात मुलीला पळवून नेल्याच्या रागातून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तरुणाच्या घराला आग लावून जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, दुचाकी तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कन्हेरे येथील भिकन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांचा मुलगा अमोल पाटील हा १६ डिसेंबर रोजी गावातील एका मुलीला पळवून घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघेही घरी परत न आल्याने मुलीच्या नातेवाईकांनी पाटील कुटुंबीयांना धमक्या दिल्या होत्या. मुलगी घरी न आल्याचा राग मनात धरून…

Read More

अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रस्ता सुरक्षा जागृती मोहीम पारोळा प्रतिनिधी : दाट धुके, थंडीची लाट आणि सतत खराब होणारे हवामान लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगाव युनिटतर्फे रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष रस्ता सुरक्षा जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. टोल संकलन करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक भूषण सुरेश बागूल, उपव्यवस्थापक सचिन श्रीधर दळवी यांच्या उपस्थितीत सबगव्हाण टोल प्लाझावर वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन सुरक्षित वाहन चालवण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे. ही मोहीम साधारणतः एक ते दोन आठवडे सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

Read More

जिल्ह्यातून तब्बल पाच राष्ट्रीय महामार्ग जाणार NH-53 – हा सुरत (गुजरात) ते पारादीप (ओडिशा) पर्यंतचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून जो धुळे, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमधून जातो. आणि हाजिरा बंदराला पारादीप बंदराशी जोडतो. NH-753F – हा महामार्ग जळगावहून पहूर, फर्दापूर, अजिंठा, सिल्लोड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, नेवासा, वडाळा, अहिल्यानगर, पुणे, मावळ, दिगी पोर्टपर्यंत आहे. जळगावमधून पुणे जाण्यासाठी एकमेव पर्याय असलेल्या या महामार्ग आता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे झाल्यास जळगावहून समृद्धी महामार्गाने मुंबई किंवा नागपूरकडे कमी वेळात पोहोचणे शक्य होईल. पुणे-छत्रपती संभाजीनगर एक्स्प्रेस हायवे अस्तित्वात आल्यानंतर जळगावहून पुण्याला देखील अवघ्या तीन तासांत पोहोचणे शक्य होणार…

Read More

बिलासपूर-मडगाव विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस नाताळ सुट्ट्यांच्या आणि नवीन वर्षानिमित्त रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने जळगाव आणि भुसावळ मार्गे विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने बिलासपूर-मडगाव, बिलासपूर-वलसाड मार्गावर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही मार्गावर प्रत्येकी ८ अशा एकूण १६ विशेष रेल्वे डिसेंबर ते जानेवारी दरम्यान धावतील. या गाड्यांना जळगावसह भुसावळ स्थानकांवर थांबा असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. बिलासपूर-मडगाव विशेष साप्ताहिक एक्स्प्रेसबिलासपूर-मडगाव (०८२४१) विशेष साप्ताहिक एक्स्प्रेसच्या २० डिसेंबर ते १० जानेवारी दरम्यान आठ फेऱ्या होतील. ही रेल्वे प्रत्येक शनिवारी बिलासपूर येथून दुपारी २.४५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे २.१५ वाजता मडगाव…

Read More