Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»कन्हेरे गावात घराला लावली आग

ताज्या बातम्या

कन्हेरे गावात घराला लावली आग

Editorial DeskBy Editorial DeskDecember 22, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

मुलीला पळवून नेल्याच्या रागातून जाळपोळ

पारोळा तालुक्यातील कन्हेरे गावात मुलीला पळवून नेल्याच्या रागातून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी तरुणाच्या घराला आग लावून जाळपोळ केल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, दुचाकी तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कन्हेरे येथील भिकन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, त्यांचा मुलगा अमोल पाटील हा १६ डिसेंबर रोजी गावातील एका मुलीला पळवून घेऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघेही घरी परत न आल्याने मुलीच्या नातेवाईकांनी पाटील कुटुंबीयांना धमक्या दिल्या होत्या. मुलगी घरी न आल्याचा राग मनात धरून संशयित कल्पेश पांडुरंग राजपूत, ज्ञानेश्वर भागवत राजपूत आणि अक्षय शंकर पाटील (सर्व रा. कन्हेरे, ता. पारोळा) यांनी १७ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाटील यांच्या घरात घुसून आग लावल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या आगीत घराचा मुख्य दरवाजा, घरातील संसारोपयोगी साहित्य, अंगणात उभी असलेली मोटारसायकल तसेच शेतीविषयक व कुटुंबातील सदस्यांची महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

एरंडोल व धरणगाव तालुक्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा क्षेत्रीय दौरा

October 27, 2026

भुसावळ तालुक्यात विवाहितेचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी

October 27, 2026

म्हसावद रेल्वेगेट १४ तास बंद; जळगावच्या महामार्गावर वाहतूक कोंडीचा धोका!

October 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add