भुसावळात कारवाईचा धसका : दामिनी पथकाकडून महाविद्यालयाच्या आवारात गस्त भुसावळ : शहरातील विविध शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात रोडरोमिओंचा धुमाकूळ वाढल्याने बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी अशा रोडरोमिओंविरोधात कारवाईसाठी दामिनी पथकाला निर्देश दिले आहेत. शहरातील बाजारपेठ हद्दीतील विविध शाळा, महाविद्यालयाच्या आवारात या पथकाकडून आता गस्त घालून रोडरोमिओंवर कारवाई केली जाणार आहे. पथक सक्रिय होताच रोडरोमिओ गायब झाले आहेत. शाळा-महाविद्यालयांभोवती रोडरोमिओंचा डेराशहरातील शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीत अनेक नामांकित शाळा-महाविद्यालये आहेत तर शहरासह तालुकास्तरावरून अनेक विद्यार्थिनी ज्ञानाजर्नासाठी शहरात येतात मात्र शाळा व क्लास सुटल्यांनंतर मुलींची छेड काढण्यात येत असल्याची तक्रारी पाहता बाजारपेठ पोलिसांनी दामिनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले आहेत. टारगटांची…
Author: Editorial Desk
हरभऱ्याला हमीभावापेक्षा तब्बल १ हजार ५०० रुपये अधिक दर मिळत आहे. जळगाव प्रतिनिधी – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली असून गुलाबी हरभऱ्याला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ५ फेब्रुवारी रोजीच्या बाजारभावानुसार गुलाबी हरभऱ्याला हमीभावापेक्षा तब्बल १ हजार ५०० रुपये अधिक दर मिळत आहे. मात्र, दुसरीकडे चाफा हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून तुरीच्या दरातही मोठी घसरण झाल्याचे चित्र आहे.केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी ५ हजार ६५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, खासगी बाजारात गुलाबी हरभऱ्याला सध्या ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात गुलाबी हरभऱ्याचे दर ७ हजार ५०० रुपयांपर्यंत…
प्रांताधिकारी गोसावी ॲक्शन मोडवर : मध्यरात्री अवैध वाळूचे चार डंपर केले जप्त जळगाव शहरालगत असलेल्या गिरणा नदी पात्रातून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर भूमिका घेत प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी थेट ॲक्शन मोडमध्ये येत मध्यरात्री धडक कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ६ रोजी रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास जळगावहून भुसावळकडे अवैध वाळू वाहतूक करणारे चार डंपर व १ मुरूम वाहतूक करणारे डंपर नशिराबाद टोल नाका येथे प्रांताधिकारी विनय गोसावी यांच्यासह पथकाने ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान प्रत्येक डंपरमध्ये प्रत्येकी दोन ब्रास वाळू आढळून आली. संबंधित चारही डंपरचा पंचनामा करून वाहने जप्त करण्यात…
अर्थसंकल्प २०२६-२७ हा महाराष्ट्रासाठी सुवर्णसंधी : ना. रक्षा खडसे मुंबई प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा भारताला २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक निर्णायक आणि ऐतिहासिक पाऊल असल्याचे मत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी व्यक्त केले आहे. युवक, महिला, शेतकरी आणि गरीब या चार प्रमुख स्तंभांवर आधारित हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा असून, राज्याला ‘आर्थिक महासत्ता’ बनवण्याच्या दृष्टीने तो मैलाचा दगड ठरणार आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विक्रमी निधीची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे क्षेत्रासाठी १५,९४० कोटी रुपयांची…
मालेगाव महापालिकेची कोसळली लिफ्ट; मोठा अनर्थ टळला नाशिक | महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक संपताच महापालिका इमारतीत मोठी दुर्घटना घडली. इमारतीतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरून अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. लिफ्टची चैन तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लिफ्टमध्ये एकूण १८ जण अडकले होते. लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळताना थेट तळमजल्यावर न आदळता पहिल्या मजल्यावर तिचा दरवाजा अडकला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सर्वजण सुखरुप राहिले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून लिफ्टमध्ये अडकलेल्या नागरिकांना एकेक करून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या लिफ्टमध्ये इस्लाम पार्टीचे असिफ…
अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याने राज्यात मोठी खळबळ; २२ तलाठींसह ३१ जण जेरबंद… जालना जिल्ह्यात अतिवृष्टी सरकारी अनुदानातील तब्बल २५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा भांडाफोड झाल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात मोठी कारवाई करत ३१ जणांना अटक केली असून यामध्ये तब्बल २२ तलाठी, ५ महसूल विभागातील कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कर्मचारी तसेच काही संगणक तज्ज्ञांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट लाभार्थी तयार करून अनुदानाची रक्कम स्वतःच्या किंवा संबंधित व्यक्तींच्या खात्यावर वळविल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, काही लाभार्थ्यांच्या नावावर…
भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसेंना मोठा धक्का; अजामीनपात्र वॉरंट जारी ! पुण्यातील भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत भर पडली आहे. विशेष सत्र न्यायालयाने एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसे हे न्यायालयात गैरहजर राहिले. कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळे न्यायालयाने ही अनुपस्थिती गंभीर मानत थेट अजामीनपात्र वॉरंट काढण्याचा आदेश दिला. मात्र, खडसेंचे जावई गिरीश चौधरी हे सुनावणीला उपस्थित होते. भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि गिरीश चौधरी यांच्याविरोधात यापूर्वीच आरोपपत्र…
भुसावळ ते नागपूर दरम्यान विशेष मेमो रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता तसंच प्रवाशांची होणारे गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते नागपूर दरम्यान विशेष मेमो रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही गाडी पूर्णतः अनारक्षित असून विदर्भ आणि खानदेश या दोन प्रमुख विभागांना जोडणाऱ्या मार्गावरून हजारो रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक रेल्वे ठरणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०११०१ ही अनारक्षित भुसावळ नागपूर मेमो विशेष गाडी शनिवारी सात वाजून पन्नास मिनिटांनी भुसावळ येथून सुटेल आणि नागपूर येथे दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०११०२ नागपूर भुसावळ विशेष…
घात की अपघात? अपघाताच्या आदल्या रात्री काय घडलं? दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड आहे की काही घातपात, याबाबत संशय अधिक गडद होत चालला आहे. विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपवण्यात आला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या CID पथकाने गुरुवारी अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची मंत्रालयात तब्बल चार तास कसून चौकशी केली. या चौकशीदरम्यान CID चा संपूर्ण रोख हा अपघाताच्या आदल्या रात्रीच्या घटनांवर होता. २७ जानेवारी रोजी अजित पवारांची कुणाशी चर्चा झाली होती? त्या…
पाणी पुरी खाताय ? तर सावधान ! १६ जणांना विष बाधा… लहान मुलांचाही समावेश ! जालना शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून, पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल 15 ते 16 जणांना फूड पॉइझनिंगचा (विष बाधा) त्रास झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेत लहान मुलांचाही समावेश असून सर्व बाधितांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटना ही जालन्यातील जुना जालना भागातील टट्टूपुरा परिसरात घडली. त्या भागात एका फेरीवाल्याने पाणीपुरीचा गाडा लावला होता. परिसरातील नागरिकांसह अनेक लहान मुलांनी या गाड्यावर पाणीपुरी खाल्ली. मात्र काही वेळातच पाणीपुरी खाल्लेल्या नागरिकांना अचानक उलट्या, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास सुरू झाला. त्रास…

