Author: Editorial Desk

ओझर गावाजवळ संयुक्त कारवाई करत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला चाळीसगाव : येथील शहर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकासोबत १८ रोजी दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास ओझर गावाजवळ संयुक्त कारवाई करत सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला असून, एक आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ३७ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या प्रकरणात आरोपी शेहजाद अहमद याकूब मोहम्मद (रा. ए वन पॅलेस सोसायटी, नवसारी, गुजरात) यास ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईदरम्यान सुमारे ९६ गोण्या विमल व इतर सुगंधित तंबाखूचा साठा तसेच अंदाजे १२ लाख रुपये किंमतीचे वाहन…

Read More

ठाकरेंचे निम्म्याहून अधिक खासदार शिंदेंच्या संपर्कात? लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हापरिषद, नगरपंचायत या निवडणुका झाल्यानंतर आता राजकीय वातावरण स्थिर होताना दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का देण्यासाठी आता शिंदेंनी खासदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. ठाकरे गटातील निम्म्याहून अधिक खासदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे यातील ४ खासदार पक्षप्रवेशासाठी अतिशय सकारात्मक असल्याचे बोललं जात आहे. नुकतंच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी केली. या दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र…

Read More

वादात सापडलेले तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते वारंवार वादाच्या भोवऱ्यात अडकत असल्याने त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ येत आहे. वादात सापडलेले तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला. वाल्मिक कराडशी संबंध असल्यामुळे मुंडे, शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे माणिकराव कोकाटे तर भोंदूबाबा अशोक खरातशी असलेले निकटचे संबंधांमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. एकंदरीत महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीची ही तिसरी विकेट पडली आहे. महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणात सध्या एक वेगळाच कल दिसून येत आहे. महायुती सरकारमधील राष्ट्रवादी…

Read More

घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आले जळगाव । युद्धजन्य परिस्थितीमुळे सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाला असून दुसरीकडे नंबर लावल्यावरही सिलिंडर वेळेत मिळत नसल्याची ओरड ग्राहकांकडून होत आहे. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचे निदर्शनास आले असून अशातच घरगुती वापराच्या सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाकडून धाडसत्र राबविले जात आहे. गेल्या आठवडाभरात २८१ ठिकाणी धाडी टाकल्यानंतर घरगुती १९ सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने १८ हजार १३४ रुपये किमतीचे सिलिंडर जप्त केले आहेत. काळाबाजार घरगुती गॅसचा रोखण्यासाठी भुसावळ महसूल विभागाच्या वतीने पथके नेमण्यात आली. ठिकठिकाणी महसूल विभाग छापेमारी करत आहे. यात…

Read More

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध पिकांची मोठी आवक सुरू झाली आहे. जळगाव। रब्बी हंगामाच्या काढणीला सुरुवात होताच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध पिकांची मोठी आवक सुरू झाली आहे. यंदा गहू, हरभरा व मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असली, मात्र यंदा सर्वाधिक चर्चेत आहे ते ‘दादर’ पीक. कमी लागवड आणि वाढती मागणी यामुळे दादरला विक्रमी दर मिळत असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. १६ मार्च रोजी बाजार समितीत दादरला शासनाच्या ₹३,४२१ हमीभावाच्या तुलनेत तब्बल ₹५,१०० प्रति क्विंटल दर मिळाला. म्हणजेच हमीभावापेक्षा सुमारे ₹२ हजारांनी अधिक भाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी सुखावला आहे. यंदा दादरचे क्षेत्र कमी राहिल्याने बाजारात आवक मर्यादित आहे,…

Read More

‘लालपरी’ला अधिक वेग आणि विस्तार देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले जळगाव |राज्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’ला अधिक वेग आणि विस्तार देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या ८३०० नवीन बसेस चालवण्यासाठी तब्बल १७ हजार ७४२ चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केली. प्रवाशांना अखंडित आणि विनाअडथळा सेवा मिळावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.प्रताप सरनाईक म्हणाले की, नियमित कर्मचारी भरतीसाठीचा प्रस्ताव सध्या अर्थ विभागाकडे…

Read More

सातपुडा पर्वतरांगांतील वाघझिरा नियतक्षेत्रात वणवा लावणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ अटक केली जळगाव । यावल वनविभागाच्या पथकाने सातपुडा पर्वतरांगांतील वाघझिरा नियतक्षेत्रात वणवा लावणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ अटक केली आहे. झेंडी, यावल येथील रहिवासी राज्या सखाराम बारेला हा वाघझिरामधील कक्ष क्रमांक १४९ मध्ये प्रत्यक्ष वणवा लावत असताना वन पथकाने ताब्यात घेतला. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने सातपुडा परिसरातील वाघझिरा राऊंड अंतर्गत परिमंडळ वाघझिरा, नियतक्षेत्र मनुदेवी कक्ष क्रमांक १४९ येथे तपासणी केली. या वेळी विविध ठिकाणी वन-वणवा लावलेला आढळून आला. पथक घटनास्थळी पोहोचले असता आरोपी राज्या सखाराम बारेला हा प्रत्यक्ष वणवा लावताना दिसून आला. त्याला न्यायालयाने १८ मार्च २०२६ पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.…

Read More

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान हवामानात मोठे बदल होताना दिसत असून एकीकडे उष्णेतेचा कडाका वाढला जळगाव । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान हवामानात मोठे बदल होताना दिसत असून एकीकडे उष्णेतेचा कडाका वाढला असताना राज्यात अवकाळी पावसाचा मोठा इशारा देण्यात आला आहे. ऐन मार्च महिन्यात राज्यात वादळी पावसासह गारपीट होत आहे. राज्यातील अनेक भागात काल पावसाने हजेरी लावली. दरम्यान आज देखील वादळी वाऱ्यांसह पावसाची आणि गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.राज्यातील २१ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट…

Read More

पाचोऱ्यात लाच स्वीकारताना दोघे भाऊ एसीबीच्या जाळ्यात जळगाव । पाचोरा येथे स्टॅम्प विक्रेत्याकडून नियमबाह्य अतिरिक्त पैशांची मागणी करून ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांवर कारवाई केली. योगेश ईश्वरलाल संघवी (वय 49, व्यवसाय – स्टॅम्प विक्रेता) व खाजगी इसम प्रशांत ईश्वरलाल संघवी (वय 53) दोन्ही रा. प्लॉट नं. ४१, विवेकानंद नगर, भडगांव रोड पाचोरा, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने खळबळ उडाली. काय आहे प्रकरण ? यातील तक्रारदार हे दि.१५.०३.२०२६ रोजी पाचोरा शहरातील जामनेर-पाचोरा रोडवरील प्रशांत झेरॉक्स येथे ५००/-रू. दराचे १० स्टॅम्प घेण्यासाठी गेले होते. तेव्हा सदर दुकानावरील अधिकृत स्टॅम्प वेंडर योगेश संघवी यांनी त्यांना ५००/- रू. चा स्टॅम्पची किंमत…

Read More

भुसावळ नगरपालिकेची साधारण सभा पुन्हा एकदा गदारोळात तहकूब करण्यात आली. भुसावळ प्रतिनिधी : शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवरून भुसावळ नगरपालिकेची साधारण सभा पुन्हा एकदा गदारोळात तहकूब करण्यात आली. आधीच वादग्रस्त ठरलेली ही सभा (मंगळवार) पुन्हा घेण्यात आली होती; मात्र सत्ताधारी आणि विरोधकांतील तीव्र वादामुळे अखेर सभा २३ मार्चपर्यंत पुढे ढकलावी लागली. सभेला सुरुवात होताच वातावरण तापले. भाजपा पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला; परंतु सत्ताधारी नगरसेविकांनी त्याला विरोध दर्शवल्याने आधी महिलांमध्ये, त्यानंतर पुरुष नगरसेवकांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाल्याचे समजते. काही क्षणांतच हा वाद उग्र रूप धारण करत दोन्ही गट समोरासमोर आले आणि सभागृहात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच नगराध्यक्षा गायत्री…

Read More