बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिस दलात भरती होऊन खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा बीड येथे सुरू असलेल्या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 1600 मीटर धावण्याच्या मैदानी चाचणीदरम्यान दीपक भास्कर वावळ (रा. परळी, जि. बीड) हा तरुण अचानक कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये सध्या पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू असून आज मैदानी शारीरिक चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवारांची 1600 मीटर धावण्याची फेरी सुरू असताना दीपक वावळ याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणांतच त्याला चक्कर येऊन तो मैदानावर कोसळला. घटनास्थळी उपस्थित…
Author: Editorial Desk
भव्य आध्यात्मिक पर्वाचे साक्षीदार होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. धानोरा, ता. चोपडा : धानोरा हे शांत, साधे गाव आता एका भव्य आध्यात्मिक पर्वाचे साक्षीदार होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. येथे उभारण्यात येत असलेले सतपंथ ज्योत मंदिराचे गृहगाभारा व जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आले असून संपूर्ण परिसरात भक्तिभाव आणि उत्साहाची लाट उसळली आहे. प.पू महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले हे कार्य केवळ मंदिर बांधकामापुरते मर्यादित नसून, धानोरा गावाला एक नवे धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख देणारे ठरत आहे. मंदिराचा जीर्णोद्धार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि पारंपरिक वास्तुशास्त्रानुसार केला जात आहे. गृहगाभाऱ्याचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले असून आतील कलाकुसर, शिल्पसजावट आणि मूर्ती प्रतिष्ठापनेची…
न्यजीव तस्करी प्रकरणात पाच आरोपी ताब्यात,दुर्मिळ ‘मांडूळ’ प्रजातीच्या सापाची तस्करीव ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. रत्नापूर येथे ‘मांडूळ’ प्रजातीचे साप तस्करी करण्याच्या उदीशाने बाळगल्याचे आढळून आल्याने पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.उपवनसंरक्षक कुमारस्वामी (ब्रह्मपुरी) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक अरविंद जे (प्राणी व वन्यजीव) ब्रह्मपुरी, सहाय्यक वनसंरक्षक मेहेश गायकवाड (तेंदू) ब्रह्मपुरी, वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) सिंदेवाही यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गस्तीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रत्नापूर येथे धाड टाकली. उपवनपरिक्षेत्र नवरगाव अंतर्गत तपासादरम्यान युवराज गहाणे (रा. रत्नापूर) यांच्या घरी प्लास्टिक पिशवीत मांडूळ प्रजातीचे साप आढळून आले. याप्रकरणी अशोक आत्राम (वय…
कन्नड तालुक्यातील जेतपूर येथील परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरण उघडकीस आणले आहे जळगाव | छत्रपती संभाजीनगर शहरातील माध्यमिक शिक्षण विभागाने ‘कॉपीमुक्त’ अभियानांतर्गत मोठी धडक कारवाई करत कन्नड तालुक्यातील जेतपूर येथील परीक्षा केंद्रावर कॉपी प्रकरण उघडकीस आणले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तब्बल १९ पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांविरुद्ध निलंबनासह कठोर कारवाई करण्यात आली असून, शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. १० फेब्रुवारी) इयत्ता १२ वीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जेतपूर येथील केंद्रावर काही विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहत तसेच उत्तरांच्या झेरॉक्स प्रतींचा वापर करत असल्याची तक्रार प्राप्त झाली. भरारी पथकाने तत्काळ सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, पर्यवेक्षकांच्या उपस्थितीतच गैरप्रकार सुरू…
अल्पमतातील भुसावळ पालिकेची पहिली सभा गाजली भुसावळ नगरपालिकेची पहिली जनरल मीटिंग 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. 50 नगरसेवकांच्या भुसावळ नगरपालिकेत भाजपचे 27 नगरसेवक असून शिवसेना 2 काँग्रेस 3 , अपक्ष 4 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 उमेदवार आहेत. गायत्री भंगाळे अध्यक्ष असलेल्या शरद पवार गटाचे बारा उमेदवार असून त्या अल्पमतातील नगराध्यक्षा आहेत. अल्पमतातील नगराध्यक्ष असलेल्या गायत्री भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली सभा पार पडली. त्यात एकूण 250 विषय विषय पत्रिकेवर होते. बाकी ऐनवेळी आयत्याचे दोन विषय आले. एकूण 250 पैकी 170 विषयांच्या संदर्भात वाद निर्माण झाले. म्हणजे भाजप तर्फे 170 विषयांना विरोध केला. या विषयांसंदर्भात एक तर मतदान घ्या किंवा…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मंत्री नितेश राणे हे उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वरळी डोम इथं कार्यक्रम झाला. त्यात सलमान खान याच्यासह अनेक सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली. याच कार्यक्रमावरून नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना मोठा टोला लगावला आहे. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील यशानंतरही त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांच्या वक्तव्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानने उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली. उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान जास्त हिंदू निघाला. राहुल गांधींसमोर उद्धव…
पिंपळगाव हरेश्वर येथील तरुणांचा संशोधनात समावेश : बंजारा समाजाच्या भटक्या जीवनशैलीवर नव्याने प्रकाश पिंपळगाव हरे. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड-लोहारा रस्त्यावरील म्हसास तांडा येथे अप्रकाशित हिंदी शिलालेख आढळून आला आहे. त्याचे वाचन करून अर्थ लावल्याने मध्यप्रदेश-महाराष्ट्र सबंध व बंजारा समाजाच्या भटक्या जीवनशैलीवर नव्याने प्रकाश पडला आहे. पिंपळगाव हरेश्वर येथील वन्यजीव संशोधक व इतिहासप्रेमी विवेक वाघे, नरेंद्र देशमुख व लातूर येथील इतिहास संशोधक कृष्णा गुदडे यांनी या शिलालेखाचे वाचन करून शिलालेखात उल्लेख असलेल्या राठोड कुटुंबीयांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा धांडोळा घेतला आहे. सदर शिलालेख ब्रिटिशकालीन असून त्याची तारीख पिल्ले जंत्रीनुसार 12 जुलै 1916 येत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘म्हसास तांडा’ मुळच्या भटक्या असलेल्या बंजारा समाजातील राठोड…
सोलर वीज मीटर ग्राहकांना नियमित वीज बिल द्या! ग्राहक पंचायत महाराष्ट्रची ठाम मागणी चंद्रपूर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावती, जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने दि. ०९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेड, भद्रावती कार्यालयास निवेदन देऊन सोलर वीज मीटरधारक ग्राहकांना नियमित व वेळेवर वीज बिल वितरित करण्याची मागणी करण्यात आली. या प्रसंगी भद्रावती शहरातील गौतम नगर परिसरातील सोलर वीज मीटर ग्राहकांना ऑगस्ट २०२५ पासून वीज बिल मिळाले नसल्याच्या तक्रारी ग्राहक पंचायतकडे प्राप्त झाल्या होत्या. दीर्घकाळ बिल न मिळाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम व आर्थिक ताण निर्माण होत असल्याची बाब संघटनेने निदर्शनास आणून दिली. या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायतने उपकार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात सप्टेंबर…
नागरिकांचा सवाल : जळगाव शहरात समस्यांचा डोंगर जळगाव : महानगरपालिका निवडणूक होवून महायुतीने सत्तेचा सोपान देखील गाठला आहे. महापौर, उपमहापौरांची निवड झाली असून प्रशासकीय राजवट संपुष्टात येसून राजकीय कार्यकिर्द सुरु झाली आहे. निवडणूक काळात जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तत: कधी व कशी होते याची जळगावकर आतुरतेने वाट पहात आहेत. शहरातील अनेक प्रभागात समस्यांचा डोंगर कायम असून समस्या सोडविण्यासाठी कारभारी केव्हा कामाला लागणार याचीच चर्चा रंगत आहे. अनेक प्रभागात मुलभूत समस्यांचे निराकरण करतांना मनपाने हात आखडता घेतला आहे. मनपा क्षेत्रातील बहुतांश व्यापारी संकुल, मार्केट, हमरस्ते अतिक्रमण, घाणीचे साम्राज्य याने त्रस्त असून गटारींची अवस्था अतिशय वार्इट झालेली आहे. रस्त्यांची दुरावस्था वाहनचालकांच्या जीवावर उठली…
पत्रकार सरंक्षण संघटनेचे मिलिंद सोनवणे यांची तक्रार ! भुसावळ प्रतिनिधी : भुसावळ शहरातील वाल्मिक चौक ते अप्सरा चौक दरम्यान सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामात गंभीर त्रुटी व प्रशासकीय मान्यतेचा भंग असल्याचा आरोप करत सोनवणे यांची सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित काम प्रशासकीय मान्यतेनुसार व तांत्रिक निकषांनुसार न होता घाईघाईने व नियमबाह्य पद्धतीने केले जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या कारणाने पुन्हा हा रस्ता चर्चेत आला आहे . सार्वजनिक बांधकाम मार्फत सदर रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर असतानाही प्रत्यक्षात रस्त्याचे कामा मध्ये अनियमितता दिसून येत असल्याचे सोनवणे यांचे म्हणणे आहे. सुरक्षितता उपाययोजना अथवा तांत्रिक देखरेख नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे…

