मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना अटक! जळगाव – वाळूने भरलेला डंपर पकडल्यानंतर त्यावर कारवाई न करता तो सोडून दिल्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या महसूल विभागाच्या दोन कर्मचा-यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडले. म्हसावदचे मंडळ अधिकारी अभिजित नामदेव येवले (वय ३९) व ममुराबादचे तलाठी सदानंद व्यंकटी मुंडे (वय ३४) आणि अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तक्रारदार हे वाळू व्यावसायिक असून ४ फेब्रुवारी रोजी ममुराबादचे तलाठी सदानंद मुंडे यांनी त्यांचा वाळूचा डंपर पकडला होता. मात्र, मंडळ अधिकारी अभिजित येवले यांनी फोनवरून सांगितल्यामुळे तो डंपर सोडून देण्यात आला होता. ही कारवाई टाळल्याच्या बदल्यात या दोघांनी…
Author: Editorial Desk
तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुक्ताईनगर प्रतिनिधी : मुक्ताईनगर ते भुसावळ रोडवरील हॉटेल महिंद्रा फाट्याजवळ असलेल्या हनुमान मंदिरासमोर गु भरधाव वेगाने येणाऱ्या एका इनोवा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर राँग साईडने (चुकीच्या बाजूने) एक दुचाकी (क्र. MP 63 ZA 6725) येत होती. या दुचाकीवर तीन जण स्वार होते. त्याच वेळी भुसावळकडून मुक्ताईनगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या इनोवा कारने (क्र. MH 41 C 5290) या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक…
थकीत हप्ता न मिळाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत विभागीय कार्यालयासमोर आंदोलन छेडले. जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना जळगाव विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी वेतनातील फरकाचा थकीत हप्ता न मिळाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत विभागीय कार्यालयासमोर आंदोलन छेडले. परिवहन मंत्र्यांकडून ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत हप्ता अदा करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र निर्धारित मुदतीत रक्कम न मिळाल्याने संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना जळगाव विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांना वेतनातील फरकाचा हप्ता अद्याप प्राप्त न झाल्याची माहिती देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राज्य नेतृत्वातील संदीप शिंदे आणि सरचिटणीस हनुमंतराव ताटे यांनी परिवहन मंत्र्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रलंबित हप्त्याबाबत चर्चा केली. त्यावेळी मंत्र्यांनी…
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सिद्धेश्वर नगरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुर्दशा वरणगाव प्रतिनिधी : भुसावळ तालुक्यातील सिद्धेश्वर नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत येते, तिची स्थिती गंभीर आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गात जाण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे रोजचं धोकादायक कसरत करावी लागते, तर शाळेतील मुतारी, शौचालय, वर्गाजवळील वरांडा आणि कंपाऊंड ही अत्यंत खराब स्थितीत आहेत.पावसाळ्यात इमारतीच्या भिंतींवर गळती होते, त्यामुळे वर्गातील परिस्थिती आणखी बिकट होते. यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य, तसेच शिक्षणावरही नकारात्मक परिणाम होत आहे. पालकांचे म्हणणे आहे, “शाळेच्या इमारतीच्या दुर्दशेमुळे मुलांना शिक्षण घेणे सुरक्षित नाही. पायऱ्या नसल्यामुळे छोटे विद्यार्थी अपघाताला सामोरे जात आहेत, तसेच…
प्रवाशांसाठी खुशखबर ! जळगावमार्गे धावणार नागपूर–मुंबई, पुणेसाठी विशेष गाड्या. जळगाव । जळगाव, भुसावळ मार्गे मुंबई, पुणे, नागपूरसाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि पुणे येथून नागपूरसाठी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला. रेल्वेत होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून या गाड्यांना जळगाव, भुसावळ स्थानकांवर थांबा असल्यानं जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सीएसएमटी–नागपूर–सीएसएमटी सुपरफास्ट विशेषछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते नागपूर दरम्यान दोन विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. २१३९ सुपरफास्ट विशेष गाडी १९ फेब्रुवारी रोजी पहाटे ००.२० वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता…
जळगाव महापालिकेत ‘दादा’ गटाला धक्का; महायुतीत असूनही समित्यांत स्थान नाही जळगाव : जळगाव महानगरपालिकेतील सत्तासमीकरणात नवा पेच निर्माण झाला आहे. महायुतीचा भाग असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याला समित्यांमध्ये एकही जागा येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष महासभेत स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची निवड होणार आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर आता लक्ष समिती रचनेकडे लागले होते. शुक्रवारी महापौर दीपमाला काळे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत समित्यांचे संख्याबळ आणि वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले. त्यानुसार १६ फेब्रुवारीला विशेष महासभा बोलावण्यात आल्याची माहिती महापौर काळे यांनी दिली. मनपातील ७५ नगरसेवकांच्या संख्याबळाच्या…
बहिणीच्या मैत्रिणीला घरी बोलावून सामुहिक बलात्कार तीन आरोपींना अटक, दोघे अल्पवयीन : आरोपीच्या वडिलांना… महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आरोपीने घरी बोलवून १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली आहे. मुख्य आरोपी हा पीडितेच्या मैत्रिणीचा भाऊ असून तो १२ वीचा विद्यार्थी आहे. ५ फेब्रुवारी रोजी आरोपीने तिला काही कारणास्तव मेसेज केला होता. त्यामुळे ती त्याला भेटायला त्याच्या घरी गेली. तिथे इतर कोणीतरी असेल असा तिचा समज होता, मात्र तिथे मुख्य आरोपीसह त्याचे इतर दोन मित्र आधीच उपस्थित होते. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून ३ जणांना बेड्या…
जळगाव परिमंडलात ‘इतक्या’ लाख ग्राहकांनी बसवले स्मार्ट वीजमीटर जळगाव । महावितरणने राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी ‘स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे)’ वीजमीटर आणले असून, यामुळे ग्राहकांना केवळ अचूक बिलच मिळणार नाही, तर चक्क वीजदरात सवलत मिळवण्याची सुवर्णसंधीही उपलब्ध झाली आहे. जळगाव परिमंडलात आतापर्यंत साडेचार लाख ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी वीजमीटर बसवण्यात आले असून, त्यांना अचूक बिलासह सवलतीचा लाभ होत आहे. या उपक्रमाबाबत काही लोकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र ग्राहकांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता स्मार्ट मीटर बसवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे. महावितरणने यापूर्वीही काळानुसार वीज मीटरमध्ये बदल केले आहेत. यांत्रिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इलेक्ट्रॉनिक मीटरनंतर…
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, जळगाव | येथील महाराष्ट्र्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जळगाव शहर शाखेच्या नवीन कार्यकारिणीची निवड एकमताने करण्यात आली आहे. यात शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी विश्वजीत चौधरी यांची निवड झाली. तर प्रधान सचिवपदी हेमंत रघुनाथ सोनवणे याची फेरनिवड करण्यात आली आहे. जळगाव शहर शाखेची बैठक नुकतीच जिल्हा कार्यालयात घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून राज्याचे पदाधिकारी प्रा. डी. एस. कट्यारे तर निरीक्षक म्हणून राज्य पदाधिकारी विश्वजीत चौधरी उपस्थित होते. सुरुवातीला विविध उपक्रम घेण्याविषयी चर्चा झाली. यात राष्ट्रीय विज्ञान दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उपक्रम घेण्याविषयी प्राथमिक नियोजन करण्यात आले. यानंतर कार्यकारिणीची एकमताने निवड झाली. यावेळी प्रा. कट्यारे यांनी, मिनाक्षी…
भरधाव वाहनाने नियंत्रण गमावल्याने झालेल्या धडकेत एका निष्पाप जीवाचा जागीच बळी झाला जळगाव-संभाजीनगर महामार्गावरील पाळधी गावाजवळ काल दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वाहनाने नियंत्रण गमावल्याने झालेल्या धडकेत एका निष्पाप जीवाचा जागीच बळी झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी गाव महामार्गाला लागून असल्याने येथे वाहने नेहमीच सुसाट असतात. आजच्या अपघातात वाहनाने समोरून येणाऱ्यांना भीषण धडक दिली, ज्यामुळे या प्रकरणात मृत्यू व गंभीर जखमा झाल्या. ग्रामीणांचे आरोप आहेत की, पाळधी परिसरात वारंवार अपघात घडत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग प्राधिकरण कुंभकर्णी झोपेत आहे.…

