Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»नागपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

ताज्या बातम्या

नागपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 12, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

बहिणीच्या मैत्रिणीला घरी बोलावून सामुहिक बलात्कार तीन आरोपींना अटक, दोघे अल्पवयीन : आरोपीच्या वडिलांना…

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आरोपीने घरी बोलवून १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली आहे. मुख्य आरोपी हा पीडितेच्या मैत्रिणीचा भाऊ असून तो १२ वीचा विद्यार्थी आहे. ५ फेब्रुवारी रोजी आरोपीने तिला काही कारणास्तव मेसेज केला होता. त्यामुळे ती त्याला भेटायला त्याच्या घरी गेली. तिथे इतर कोणीतरी असेल असा तिचा समज होता, मात्र तिथे मुख्य आरोपीसह त्याचे इतर दोन मित्र आधीच उपस्थित होते.

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असून ३ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तीन आरोपींपेकी दोन अल्पवयीन आहेत. सर्वांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अल्पवयीन मुलाने बहिणीच्या मैत्रिणीची छेड काढली होती. त्यानंतर फोनवर मेसेज पाठवत मुलीला घरी बोलवले. मात्र त्यावेळी घरी फक्त हा अल्पवयीन मुलगा आणि त्याचे दोन मित्र होते. त्यांनी तिला आतल्या खोलीत नेऊन बलात्कार केला. अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी हा बारावीचा विद्यार्थी आहे. मुलीवर अत्याचार केल्याचे व्हिडिओ शूटही करत कुणाला काही सांगितले तर व्हायरल करण्याची धमकी दिली.

या प्रकारामुळे पीडित मुलगी प्रचंड घाबरली होती. मात्र, अखेर चार दिवसांनंतर तिने हिंमत एकवटली आणि घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. पालकांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपी मुलाचा मंगळवारी पहिला पेपर होता, पण क्रूर कृत्यामुळे परीक्षा केंद्रात जाण्याऐवजी त्याची रवानगी पोलिसात झाली. अत्याचाराचा व्हिडिओ खरोखर काढला का? तपास सुरू आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांकडून आरोपींचा तपास करण्यात येत आहे.

आरोपीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटकाया घटनेचे पडसाद आरोपींच्या कुटुंबावरही उमटले आहेत. मुख्य आरोपीची १२ वीची परीक्षा सुरू असून या गुन्ह्यामुळे त्याला आपला पहिला पेपर देता आला नाही. आपला मुलगा अशा गंभीर गुन्ह्यात अडकल्याची बातमी कळताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add