घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन घरे पूर्णतः जळून खाक जळगाव शहरातील जुने जळगाव भागात असलेल्या कुढापा चौक परिसरात रविवारी सकाळी सुमारे दहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. एका राहत्या घरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन घरे पूर्णतः जळून खाक झाली. या आगीत पीडित कुटुंबांचा संसार अक्षरशः भस्मसात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुढापा चौक परिसरात निलेश शंकर शिरसाठ आणि बापू शंकर शिरसाठ यांची घरे आहेत. रविवारी सकाळी अचानक त्यांच्या घरात आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार प्रथम शॉर्टसर्किट झाले असून त्यानंतर गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की आगीच्या ज्वाळांनी…
Author: Editorial Desk
शासकीय कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास चांगलेच महागात पडले बोदवड – ऑनलाइन कर्ज अॅपवरून कर्ज घेणे शासकीय कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास चांगलेच महागात पडले आहे. कर्जाची पूर्ण परतफेड करूनही पुन्हा हप्ता भरण्याची मागणी करत बदनामीची धमकी देण्यात आली. एवढ्यावरच न थांबता संबंधित अॅपच्या हॅकरने त्या कर्मचाऱ्याचे अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनोज सदाशिव तायडे (वय ४०) हे तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी गत आठवड्यात एका ऑनलाइन अॅपवरून सुमारे साडेतीन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज प्रक्रियेदरम्यान त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, ई-मेल व संपर्क क्रमांक अशी वैयक्तिक माहिती अॅपवर…
संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात जळगाव – भरधाव डंपरने एका वृद्धाला चिरडल्याची हृदयद्रावक घटना कालिंका माता चौक परिसरात शुक्रवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. या भीषण अपघातात ५७ वर्षीय प्रभाकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५७ रा. जुने जळगाव) हे बाजार करून भाजीपाला घेऊन घरी परतत होते. यावेळी कालिंका माता चौकातून जाणाऱ्या एका भरधाव डंपरने…
सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ ! खाद्यतेलासह मसाले, डाळींच्या दरात मोठी वाढ जळगाव । एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडले असून त्यातच आता मसाले, खाद्यतेल, तूरडाळ आणि इतर किराणा मालाच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहक हैराण झाले आहेत. गेल्या काही आठवड्यांत अनेक वस्तूंच्या किमतींमध्ये १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या होळी, रमजान आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. मात्र याच काळात किराणा मालाच्या दरात मोठी वाढ झाली. यामध्ये लाल मिरची, धणे, जिरे, हळद, लवंग, मिरे यांसारख्या मसाल्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. काही मसाल्यांचे दर प्रतिकिलो शंभर ते दोनशे रुपयांनी…
२१ वर्षीय तरुणाच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे जळगाव । जळगाव शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मोहम्मद साद अय्युब खान (रा. शाहूनगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर १० फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उस्मानिया पार्क परिसरात एक तरुण शस्त्रासह फिरत असल्याचे समजले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड…
देशव्यापी लाक्षणिक संपाला जळगाव जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. जळगाव । केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रम संहितांविरोधात तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपाला जळगाव जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सुमारे ७ हजार ८०० अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी संपात सहभागी होत जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शासनाचे लक्ष वेधले. श्रम संहिता कामगारविरोधी असून त्या रद्द कराव्यात, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. दरम्यान यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास हेमंत भदाणे यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले सदर…
ज्यामुळे रात्री आणि पहाटेचा गारठा कमी झाला असून दुपारी उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. जळगाव । जळगाव शहरासह जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला असून जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात वाढ होताना दिसून आली. ज्यामुळे रात्री आणि पहाटेचा गारठा कमी झाला असून दुपारी उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. काल गुरुवारी जळगावचे रात्रीचे किमान तापमान १४.५ अंशावर तर दिवसाचे कमाल तापमान ३३.४ अंशावर पोहोचले. यामुळे दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत तापमान सरासरी ३२ अंशांच्या आसपास होते. मात्र यंदा तापमानात वाढ दिसून येत असल्याने जळगावकर घामाघूम झाले आहे. सामान्यतः मार्चच्या उत्तरार्धात जाणवणारी उष्णता यंदा फेब्रुवारीच्या मध्यापासूनच जाणवू लागली…
फार्मर कप प्रशिक्षणासाठी शेतकरी रवाना जळगाव तालुक्यातील कृषी विभाग व उमेद अभियानांतर्गत महिला व पुरुष शेतकरी पाणी फाउंडेशनच्या ‘फार्मर कप’ निवासी प्रशिक्षणासाठी के.व्ही.के. जळगाव जामोद सेंटर, जिल्हा बुलडाणा येथे रवाना झाले. या प्रशिक्षणाचा उद्देश शेतकऱ्यांना जलसंधारण, शाश्वत शेती पद्धती व ग्रामविकास विषयक मार्गदर्शन करणे हा आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी प्रोजेक्ट डायरेक्टर (DRDA) राजू लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती देसले, कृषी अधिकारी स्नेहल थेऊरकर, बीडीओ चंद्रकांत बोडरे, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक देवेंद्र सुर्यवंशी तसेच पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक प्रल्हाद आरसुळे, उपविभागीय समन्वयक सुहास…
ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषद प्रथम जळगाव : प्रशासकीय कामात वेगवानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या 150 दिवसांच्या विशेष ‘सेवाकर्मी ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमात जळगाव जिल्हा परिषदेने बाजी मारली असून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत जळगाव जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात ई-गव्हर्नन्सवर विशेष भर दिला जात होता. या यशामागे प्रामुख्याने विविध घटक कारणीभूत ठरले. कागदी फायलींचा प्रवास थांबवून संपूर्ण कामकाज डिजिटल करण्यावर भर, नागरिकांना विविध दाखले आणि सेवा घरबसल्या मिळाव्यात यासाठी यंत्रणा कार्यान्वित, सामान्य नागरिकांच्या तक्रारींची वेळेत दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी ‘रिअल टाइम’ मॉनिटरिंग, प्रलंबित प्रकरणांचा…
मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करून सरकारी कामात अडथळा जळगाव प्रतिनिधी – मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध बुधवारी सायंकाळी सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी दुपारी सावदा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर खडसे यांनी त्यांना बोलावून घेतले. यावेळी त्यांनी तासखेडा (ता. रावेर) येथील गौण खनिज प्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही, असा जाब विचारत मोठ्या आवाजात आरडाओरडा केला. तसेच तुम्ही कोट्यवधी रुपये खाल्ले आहेत, असे म्हणत अपमानास्पद शब्द वापरल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनी याबाबत…

