Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»गावठी पिस्तूलसह २१ वर्षीय जळगावात तरुण जेरबंद

ताज्या बातम्या

गावठी पिस्तूलसह २१ वर्षीय जळगावात तरुण जेरबंद

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 13, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

२१ वर्षीय तरुणाच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे

जळगाव । जळगाव शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणाच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. मोहम्मद साद अय्युब खान (रा. शाहूनगर, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर १० फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उस्मानिया पार्क परिसरात एक तरुण शस्त्रासह फिरत असल्याचे समजले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ त्या परिसरात सापळा रचला. यावेळी मोहम्मद साद अय्युब खान हा मोटारसायकलवरून येताना दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. त्याची मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली आहे.

याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेले शस्त्र त्याने कोठून आणले आणि त्याचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सुनील पाटील करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add