Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडले

ताज्या बातम्या

जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडले

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 13, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची झळ ! खाद्यतेलासह मसाले, डाळींच्या दरात मोठी वाढ

जळगाव । एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे घरगुती बजेट कोलमडले असून त्यातच आता मसाले, खाद्यतेल, तूरडाळ आणि इतर किराणा मालाच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहक हैराण झाले आहेत. गेल्या काही आठवड्यांत अनेक वस्तूंच्या किमतींमध्ये १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या होळी, रमजान आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. मात्र याच काळात किराणा मालाच्या दरात मोठी वाढ झाली. यामध्ये लाल मिरची, धणे, जिरे, हळद, लवंग, मिरे यांसारख्या मसाल्यांच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. काही मसाल्यांचे दर प्रतिकिलो शंभर ते दोनशे रुपयांनी वाढल्याचे दिसून येते. उत्पादन घट, वाहतूक खर्चात वाढ आणि वाढती मागणी ही दरवाढीमागील प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.

खाद्यतेल व डाळींचीही वाढ

तूरडाळ, हरभरा डाळ तसेच सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या दरातही वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दरवाढ झाल्याने किरकोळ बाजारात त्याचा थेट परिणाम जाणवत आहे. लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात जेवणावळी होत असल्याने डाळी व तेलाची मागणी वाढली आहे.

दरवाढीमुळे लग्नसमारंभाचे आयोजन करणाऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. केटरिंग दरात वाढ झाली असून प्रति ताट दरात २० ते ३० रुपयांची वाढ झाल्याचे समजते. दरवाढीमुळे ग्राहकांना “स्वस्त काय?” हा प्रश्न पडला आहे. काही भाजीपाला आणि स्थानिक हंगामी पिके तुलनेने स्थिर दरात उपलब्ध असली तरी किराणा आणि मसाल्यांवरील वाढीमुळे एकूणच घरखर्च वाढला आहे.

व्यापाऱ्यांच्या मते, सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर दर काही प्रमाणात स्थिर होतील. मात्र जागतिक बाजारातील परिस्थिती आणि स्थानिक उत्पादन यावर पुढील दर अवलंबून असतील. मात्र सध्याच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत असून आगामी काळात दर कमी होतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे आहेत दर?

विलायची- ३४०
शहाजिरा -१५०
लवंग -१५०
मिरे- १७०
जिरे -३१०
मिरची – ४०० (किलो), पंधरा दिवसापूर्वी ३४० रुपये किलो
खाद्यतेल – १५० ते १६० रुपये प्रति किलो
तूर डाळ- १२५ ते १३०

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add