Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शासकीय कर्मचाऱ्याला ऑनलाइन अॅपवरून कर्ज घेणे पडले महागात फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ताज्या बातम्या

शासकीय कर्मचाऱ्याला ऑनलाइन अॅपवरून कर्ज घेणे पडले महागात फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 15, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

शासकीय कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास चांगलेच महागात पडले

बोदवड – ऑनलाइन कर्ज अॅपवरून कर्ज घेणे शासकीय कार्यालयातील एका कर्मचाऱ्यास चांगलेच महागात पडले आहे. कर्जाची पूर्ण परतफेड करूनही पुन्हा हप्ता भरण्याची मागणी करत बदनामीची धमकी देण्यात आली. एवढ्यावरच न थांबता संबंधित अॅपच्या हॅकरने त्या कर्मचाऱ्याचे अश्लील फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनोज सदाशिव तायडे (वय ४०) हे तहसील कार्यालयात कार्यरत आहेत. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी गत आठवड्यात एका ऑनलाइन अॅपवरून सुमारे साडेतीन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज प्रक्रियेदरम्यान त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, ई-मेल व संपर्क क्रमांक अशी वैयक्तिक माहिती अॅपवर अपलोड केली. हे कर्ज त्यांनी आठ दिवसांत पूर्णपणे फेडले. मात्र, अॅपकडून कर्ज न भरल्याचा दावा करत तत्काळ हप्ता भरण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा बदनामी करण्याची धमकी देण्यात आली.

त्यांनी कर्ज भरल्याचे पुरावे पाठवूनही संबंधितांकडून त्रास सुरूच राहिला. ‘तुम्हाला जे करायचे ते करा,’ असे सांगून त्यांनी फोन कट केला. यानंतर काही वेळातच संबंधित हॅकरने संबधितांचे अश्लील फोटो तयार करून या कर्मचाऱ्याच्या मित्र-मैत्रिणी व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाठवले. हा प्रकार लक्षात येताच तायडे घाबरले आणि त्यांनी तत्काळ बोदवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी बोदवड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. दरम्यान, ऑनलाइन कर्ज अॅपच्या वाढत्या फसवणूक प्रकारांमुळे नागरिकांनी वैयक्तिक माहिती देताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add