Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»मुक्ताईनगर ते भुसावळ रोडवरील भरधाव कार चालकाची दुचाकीस जोरदार धडक . एक जण जागीच ठार.

ताज्या बातम्या

मुक्ताईनगर ते भुसावळ रोडवरील भरधाव कार चालकाची दुचाकीस जोरदार धडक . एक जण जागीच ठार.

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 13, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मुक्ताईनगर प्रतिनिधी : मुक्ताईनगर ते भुसावळ रोडवरील हॉटेल महिंद्रा फाट्याजवळ असलेल्या हनुमान मंदिरासमोर गु भरधाव वेगाने येणाऱ्या एका इनोवा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोन वाजेच्या सुमारास मुक्ताईनगरकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर राँग साईडने (चुकीच्या बाजूने) एक दुचाकी (क्र. MP 63 ZA 6725) येत होती. या दुचाकीवर तीन जण स्वार होते. त्याच वेळी भुसावळकडून मुक्ताईनगरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या इनोवा कारने (क्र. MH 41 C 5290) या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला.


अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते तुषार बोरसे यांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देत तिन्ही जखमींना मुक्ताईनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला होता. मयताची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे. उर्वरित दोन जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात या अपघातासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add