Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»भुसावळ मार्गे मुंबई, पुणे, नागपूरसाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

ताज्या बातम्या

भुसावळ मार्गे मुंबई, पुणे, नागपूरसाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 12, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

प्रवाशांसाठी खुशखबर ! जळगावमार्गे धावणार नागपूर–मुंबई, पुणेसाठी विशेष गाड्या.

जळगाव । जळगाव, भुसावळ मार्गे मुंबई, पुणे, नागपूरसाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि पुणे येथून नागपूरसाठी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला. रेल्वेत होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून या गाड्यांना जळगाव, भुसावळ स्थानकांवर थांबा असल्यानं जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सीएसएमटी–नागपूर–सीएसएमटी सुपरफास्ट विशेष
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते नागपूर दरम्यान दोन विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. २१३९ सुपरफास्ट विशेष गाडी १९ फेब्रुवारी रोजी पहाटे ००.२० वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. तर ०२१४० सुपरफास्ट विशेष गाडी १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.०० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा?
या गाड्यांना दोन्ही बाजुने दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा, या प्रमुख स्थानकांवर थांबे असतील. गाड्यांची रचना प्रवाशांच्या गरजेनुसार एसी, स्लीपर आणि जनरल डब्यांसह करण्यात आली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर
लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान चार विशेष सेवा देण्यात येणार आहेत. ०१०२१ सुपरफास्ट विशेष गाडी १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ००.५५ वाजता एलटीटीहून सुटून त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूरला पोहोचेल. तर ०१०२२ विशेष गाडी १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८.०० वाजता नागपूरहून सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता एलटीटीला पोहोचेल.या गाड्यांना दोन्ही बाजुने ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील. इगतपुरी येथे थांबा फक्त नागपूर–एलटीटी मार्गावरील ०१०२२ गाडीसाठी असणार आहे.

पुणे-नागपूर विशेष गाडी
पुणे आणि नागपूर दरम्यानही विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. ०१४६७ सुपरफास्ट विशेष गाडी १३ आणि २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३.५० वाजता पुण्याहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. ०१४६८ सुपरफास्ट विशेष गाडी १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.०० वाजता नागपूरहून सुटेल. आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात पोहोचेल. याशिवाय ०१४१९/०१४२० या दोन अतिरिक्त विशेष गाड्या पुणे आणि नागपूर दरम्यान १८ आणि १९ फेब्रुवारी २०२६ रोजी धावणार आहेत.या सर्व गाड्यांना उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add