
उत्राण ता एरंडोल येथील अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई धनगर आपल्या कर्तव्यावर कार्यरत होत्या.
पिंपळगाव हरे : उत्राण ता एरंडोल येथील अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई धनगर आपल्या कर्तव्यावर कार्यरत होत्या. दरम्यान अंगणवाडी शाळेतील मुलांसाठी स्वयंपाक बनवत असतानांना एलपीजी गॅस सिलेंडरची नळी लिक होऊन अचानक पेट घेणार तेवढ्यात अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई ठाकरे यांनी वेळीच सावधगिरी बाळगत आपल्या जीवाची परवा न करता पेट घेणाऱ्या गॅस गळतीला विझवून शाळेतील 25 विद्यार्थ्यांचा जीव वाचवला.
या त्यांच्या हिमतीची दखल घेत कासोदा पोलीस स्टेशन यांच्या वतीने चाळीसगाव पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी विजयकुमार ठाकुरवाड, कासोदा पोलीस स्टेशन एपीआय श्रीकांत पाटील, पीएसआय धर्मराज पाटील, पोलीस पाटील प्रदीप तिवारी यांच्या हस्ते अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई दिलीप ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला. अंगणवाडी मदतनीस रंजनाबाई ठाकरे यांचे आमदार अमोल पाटील यांनी देखील कौतुक केले आहे.


