Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»अचानक मार्च महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वादळी वाऱ्यांसह नुकसान !

ताज्या बातम्या

अचानक मार्च महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वादळी वाऱ्यांसह नुकसान !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 31, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चाळीसगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावत नागरिकांना मोठा धक्का दिला

चाळीसगाव – मार्च महिन्यात अनपेक्षितपणे चाळीसगाव तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावत नागरिकांना मोठा धक्का दिला. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन काळ्या ढगांसह विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाने अनेक भागांना तडाखा दिला.

या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे तसेच घरांच्या छपरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काही ठिकाणी शेतपिकांनाही फटका बसल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून, वारा वादळ, विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला जात असून, नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे तसेच सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add