
एमएसईबी अधिकारी बोरसे तसेच क्षेत्रीय महसूल, कृषी, ग्रामविकास कर्मचारी उपस्थित होते.
चोपडा : तालुक्यातील वर्डी, गरताड, कुरवेल या गावांच्या शिवारातील मका, केळी व इतर पीक नुकसानीचा आढावा घेत .3 एप्रिलरोजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. कुरवेल येथील जिल्हा परिषद शाळेचे वादळी पावसामुळे नुकसान झाले. या शाळेला भेट देऊन त्यांनी परिस्थिती जाणून घेतली.
सर्व नुकसान बाधित गावांमध्ये पंचनामे करून एकही नुकसान बाधित शेतकरी वंचित राहू नये, याबाबत काळजी घेण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. एमएसईबी अधिकारी यांच्याकडून नुकसानीबाबत आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करून शहरी व ग्रामीण (कृषीसह) वीजपुरवठा लवकरात सुरवात करण्याबाबत आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी निर्देश दिले. यावेळी भाऊसाहेब थोरात (तहसीलदार) , तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, गटविकास अधिकारी अंजली बर्गे, मुख्याधिकारी रामनिवास झंवर, एमएसईबी अधिकारी बोरसे तसेच क्षेत्रीय महसूल, कृषी, ग्रामविकास कर्मचारी उपस्थित होते.
अडावद येथे चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाने शेतकर्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले शेतकरी पुन्हा संकटाच्या खाईत आहे. ऐन पिक काढणीच्या वेळेस गहू, ज्वारी, बाजरी कांदा, केळी या पिकांचे प्रचंडनुकसान झाले आहे. चार महिने काबडकष्ट त्यात लोडशेडींगसह विविध अडचणींना सामोरे जावून काळ्या आईच्या कुशीत पीकं फुलवितात. अन् शेवटच्या क्षणी अवकाळी पावसामुळे धान्य घरात येण्याचे वेळेस पीक जमीनदोस्त होऊन तोंडचा घास निसर्ग हिरावून नेत असेल तर शेतकर्यांनी जगायचे तरी कसे? असा यक्षप्रश्न आहे. बळीराजाचा पुरता खचून गेला आहे. भीक मागायची वेळ येऊन ठेपेल. त्या आधीच शासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत शेतकर्यांमधून व्यक्त केले जात आहे.


