Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»आरोग्य»महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; योगगुरूंचा सन्मानाने गौरव

आरोग्य

महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या गुरुपौर्णिमा उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; योगगुरूंचा सन्मानाने गौरव

Editorial DeskBy Editorial DeskAugust 2, 2026Updated:August 2, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव | प्रतिनिधी

जळगावातील सेंट्रल लायन्स क्लब येथे महाराष्ट्र योगशिक्षक संघ, जळगाव जिल्हा समिती आणि सन योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात महामुनी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर जळगावातील ज्येष्ठ योगगुरू नारायणदादा जाखेटे, सुभाषदादा जाखेटे, अरविंद सापकर, हेमांगिनी सोनवणे, डॉ. भावना चौधरी यांच्यासह महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. कृणाल महाजन आणि उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख योगशिक्षक सुनील गुरव यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, योग संस्कृतीचे संवर्धन आणि समाजात योगाचा प्रसार करण्याची गरज अधोरेखित केली. नियमित योगाभ्यासामुळे निरोगी जीवनशैली घडते आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात ज्येष्ठ योगगुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा सोमवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुनील गुरव यांनी केले. यावेळी सन योगा ग्रुपतर्फे योगशिक्षक सुनील गुरव यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जळगाव जिल्हा समितीचे पदाधिकारी, सन योगा ग्रुपचे सदस्य आणि स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांसाठी नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली.

गुरुपौर्णिमा उत्सवामुळे गुरु-शिष्य परंपरेचा गौरव झाला असून योग क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ योगगुरूंना योग्य सन्मान मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add