जळगाव प्रतिनिधी | येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फातेमा नगर एमआयडीसी येथे मेकॅनिक डिझेल ट्रेडचे प्रशिक्षण घेतलेल्या मोहम्मद रेहान शेख रफीक यांनी आयटीआय परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये त्यांनी मेकॅनिक डिझेल ट्रेडचे प्रशिक्षण घेतले. १० ऑगस्ट २०२६ रोजी जाहीर झालेल्या निकालात रेहान शेख यांनी ६०० पैकी ४०१ गुण मिळवत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला.
ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत त्यांनी मेकॅनिक डिझेल ट्रेडचे प्रशिक्षण पूर्ण केले. तांत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्य आत्मसात करत त्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद ठरत आहे.
रेहान शेख यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पुढील शैक्षणिक तसेच व्यावसायिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
विशेष म्हणजे, मोहम्मद रेहान शेख रफीक हे एसएफ न्यूज महाराष्ट्रचे पत्रकार फैज़ान शेख यांचे लहान भाऊ आहेत. मोहम्मद रेहान शेख रफीक यांच्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!



