Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगावच्या बाजारात कोकणातील ‘पेण’च्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींची आकर्षक सजावट!

क्राईम

जळगावच्या बाजारात कोकणातील ‘पेण’च्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींची आकर्षक सजावट!

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 8, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या बाजारपेठेत कोकणातील रायगड जिल्ह्यातील पेण येथून शाडू मातीच्या आकर्षक आणि सुबक गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी यंदा शाडू मातीच्या मूर्तींना ग्राहकांकडून चांगली पसंती मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

जळगावातील श्री गणेश कला केंद्रात पेणच्या कारागिरांनी तयार केलेल्या विविध आकारांच्या आणि आकर्षक कलाकुसरीच्या मूर्ती उपलब्ध आहेत. नैसर्गिक मातीसोबत नैसर्गिक रंगांचा वापर करून या मूर्ती तयार केल्या जात असल्याने त्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

घरगुती गणेशमूर्तींसह छोट्या सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. सहा इंचांपासून तब्बल अडीच फुटांपर्यंत विविध आकारांच्या मूर्ती ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. पारंपरिक रूपापासून आधुनिक कलाकुसरीपर्यंत अनेक आकर्षक पर्याय येथे पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, यंदा वाहतुकीचा खर्च वाढल्याने शाडू मातीच्या मूर्तींच्या दरात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, किंमती वाढल्या असतानाही पर्यावरण संवर्धनाचा विचार करून ग्राहकांकडून शाडू मातीच्या मूर्तींना वाढती मागणी मिळत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

एकूणच, ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषासोबत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जळगावकरांचा शाडू मातीच्या गणेशमूर्तींकडे वाढता कल दिसून येत आहे.

 

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जुने जळगावात बैलपोळ्याचा उत्साह; सजलेल्या बैलांचे थाटात पूजन

September 10, 2026

दुचाकीच्या आवाजावरून वाद पेटला; तरुणाला घरातून बाहेर बोलावून मारहाण

September 10, 2026

पत्रकार परिषद: गणेशोत्सव महामंडळात फूट पडल्याचं चुकीचं चित्र, डॉ. आचार्य दादांचा वारसा एकदिलाने पुढे नेणार..!

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add