Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; महागाईच्या झळा सार्वजनिक मंडळांना

जळगाव

गणेशोत्सवाच्या तयारीला वेग; महागाईच्या झळा सार्वजनिक मंडळांना

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 9, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरात गणेशोत्सवाचे आगमन अवघ्या चार दिवसांवर आले असून, सार्वजनिक गणेश मंडळांच्या तयारीला आता वेग आला आहे. शहरातील विविध भागांमध्ये मंडप उभारणी, सजावट, विद्युत रोषणाई तसेच इतर कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.

गणरायाच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू असून, रात्री उशिरापर्यंत मंडप उभारणीचे काम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट असल्याचे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मंडप, गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाई आणि मजुरांची मजुरी यासह विविध खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना यंदा तब्बल २५ ते ३० टक्के अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी मंडळांकडून विविध उपक्रमांचे नियोजन केले जात असले, तरी वाढत्या खर्चामुळे बजेटचे गणित बिघडले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतेही वाढ करावी, अशी मागणी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

एकीकडे गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू असताना दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे मंडळांसमोरील आर्थिक आव्हानही वाढले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जुने जळगावात बैलपोळ्याचा उत्साह; सजलेल्या बैलांचे थाटात पूजन

September 10, 2026

दुचाकीच्या आवाजावरून वाद पेटला; तरुणाला घरातून बाहेर बोलावून मारहाण

September 10, 2026

पत्रकार परिषद: गणेशोत्सव महामंडळात फूट पडल्याचं चुकीचं चित्र, डॉ. आचार्य दादांचा वारसा एकदिलाने पुढे नेणार..!

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add