Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»दुचाकीच्या आवाजावरून वाद पेटला; तरुणाला घरातून बाहेर बोलावून मारहाण

क्राईम

दुचाकीच्या आवाजावरून वाद पेटला; तरुणाला घरातून बाहेर बोलावून मारहाण

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 10, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पारोळ्यातील वसंतनगर परिसरातील घटना; चौघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

पारोळा प्रतिनिधी : दुचाकीच्या एक्सीलेटरचा मोठा आवाज झाल्याच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण
झाला आणि त्याचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याची घटना पारोळा शहरातील वसंतनगर परिसरात घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी आदित्य धनराज जाधव हे 7 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मोटारसायकलवरून आपल्या घरी जात होते. त्यावेळी मोटारसायकलच्या एक्सीलेटरचा मोठा आवाज झाल्याचे कारण पुढे करत आरोपींनी त्यांच्याशी वाद घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर आरोपींनी फिर्यादीला घराबाहेर बोलावून शिवीगाळ केली. वाद वाढल्यानंतर चौघांनी मिळून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादीला दुखापत झाल्याचेही पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी राहुल राजेसिंग जाधव, प्रेमराज राजेसिंग जाधव, सुनील राजेसिंग जाधव आणि विशाल राजेसिंग जाधव यांच्याविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद इतका वाढला की, प्रकरण थेट पोलिसांपर्यंत पोहोचले. घटनेमागील नेमका वाद, मारहाणीची परिस्थिती आणि संबंधित आरोपींची भूमिका याबाबत पारोळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जुने जळगावात बैलपोळ्याचा उत्साह; सजलेल्या बैलांचे थाटात पूजन

September 10, 2026

पत्रकार परिषद: गणेशोत्सव महामंडळात फूट पडल्याचं चुकीचं चित्र, डॉ. आचार्य दादांचा वारसा एकदिलाने पुढे नेणार..!

September 9, 2026

भरधाव कंटेनर पलटी; दुचाकीचा चुराडा, तरुणाचा दबून मृत्यू!

September 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add