Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»गच्चीवरून पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

क्राईम

गच्चीवरून पडल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 19, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जळगावच्या पिंप्राळा परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. गुरुदत्त कॉलनीत गच्चीवरून खाली पडल्याने ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मधुरा सुरेश खामणेकर, वय ५०, असे मयत महिलेचे नाव आहे.

शुक्रवारी १८ सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास मधुरा खामणेकर या कपडे सुकवण्यासाठी घराच्या पहिल्या मजल्यावरील गच्चीवर गेल्या होत्या. त्यावेळी अचानक त्यांचा तोल गेल्याने त्या गच्चीवरून खाली पडल्या. या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add