Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»जामनेर तहसील कार्यालयात प्रथमच महात्मा ज्योतिराव फुले लोकअदालत उत्साहात संपन्न

जळगाव

जामनेर तहसील कार्यालयात प्रथमच महात्मा ज्योतिराव फुले लोकअदालत उत्साहात संपन्न

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 19, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जामनेर प्रतिनिधी :- तहसील कार्यालयात प्रलंबित असलेल्या विविध वादग्रस्त महसुली प्रकरणांचा जलद गतीने निपटारा व्हावा, यासाठी गुरुवारी जामनेर तहसील कार्यालयात प्रथमच ‘महात्मा ज्योतिराव फुले लोकअदालत’ उत्साहात पार पडली. तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोकअदालतीत वकील व पक्षकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपसातील सामंजस्याने अनेक प्रकरणांवर तोडगा काढला.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या निर्देशानुसार, न्यायप्रविष्ट प्रकरणांमधील पक्षकारांना तत्काळ न्याय मिळण्यासाठी दिवाणी व फौजदारी न्यायालयांप्रमाणेच कार्यकारी दंडाधिकारी न्यायालय असलेल्या तहसील कार्यालयांमध्येही लोकअदालत घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तहसील कार्यालयाच्या सभागृहात या विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी निवासी नायब तहसीलदार सतीश इंगळे, नायब तहसीलदार प्रसंजीत गांगुर्डे, जामनेर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. के. पी. बरी, ॲड. आर. बी. पाटील, ॲड. पी. एन. पाटील, ॲड. एस. आर. पाटील, ॲड. विनोद धनगर, ॲड. संदीप वाघ यांच्यासह महसूल अधिकारी, कर्मचारी व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकअदालतीच्या माध्यमातून वाद सामोपचाराने मिटल्यामुळे पक्षकारांचा वेळ व पैशांची बचत झाली असून, अशा उपक्रमामुळे प्रलंबित महसुली प्रकरणांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add