Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»माळपिंप्रीत मूलभूत सुविधांचा बोजवारा; शाळा, मंदिरे अन् रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य

ताज्या बातम्या

माळपिंप्रीत मूलभूत सुविधांचा बोजवारा; शाळा, मंदिरे अन् रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 20, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जामनेर प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील माळपिंप्री गावात मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून, विविध भागात अस्वच्छता आणि गैरसोयींचे चित्र दिसून येत आहे. मराठी शाळेसमोरील परिसर, पाझर तलाव, मुख्य रस्ते तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने अनेक ठिकाणी दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावातील विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरातही गटारी तुंबलेल्या असून, नियमित साफसफाईचा अभाव असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सार्वजनिक शौचालयांची अवस्थाही बिकट असून, पाण्याअभावी आणि देखभालीअभावी ती वापराविना पडून असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गावातील सन १९२५ मधील जिल्हा परिषद शाळेचा प्रश्न अधिक गंभीर असल्याचे समोर आले आहे. शाळेच्या वर्गखोल्यांच्या स्लॅबमधून पावसाचे पाणी गळत असून, प्लास्टरचा काही भाग कोसळल्याने एका महिला शिक्षिकेला दुखापत झाल्याची माहिती आहे. या घटनेला महिना उलटूनही अद्याप तांत्रिक पाहणी झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शाळेतील जुनी पाण्याची टाकीही जीर्ण झाली असून, शाळा आणि अंगणवाडी परिसरात स्वच्छता तसेच आवश्यक सुविधांचा अभाव असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गावातील विविध समस्यांकडे संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्वच्छता, सांडपाणी निचरा, सार्वजनिक शौचालये आणि शाळेच्या इमारतीची तांत्रिक तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांकडून होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add