Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मोठी बातमी: माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या कारणावरून मित्राची हत्या : दोघांना अटक !

क्राईम

मोठी बातमी: माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या कारणावरून मित्राची हत्या : दोघांना अटक !

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 21, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

फैजपूर प्रतिनिधी | माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन मित्रांनी एका मजुराची दगडाने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालोद गावात घडली. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे.

मृताचे नाव रमेश ईश्वरसिंग भावर (वय ३५, रा. खंडवा, मध्य प्रदेश) असे आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सूरज कोळी आणि सूरज ऊर्फ गोलू नेमाडे अशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश भावर आणि दोन्ही आरोपी मजुरीचे काम करीत होते. तिघांची मैत्री असून ते एकत्र दारू पिण्यासाठी बसत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास तिघेही बालोद येथे एकत्र दारू पीत होते.

रमेशने स्वतःच्या पैशातून मासे खरेदी केले होते. हे मासे त्याने मुकेश नामक मित्राकडे जेवण तयार करण्यासाठी दिले होते. यावेळी आरोपी सूरज कोळी याने आपल्या वडिलांनाही माशांचे जेवण देण्याचा आग्रह केला. यावरून रमेश आणि आरोपींमध्ये वाद झाला. वाद वाढत जाऊन हाणामारी झाली. याचदरम्यान दोन्ही आरोपींनी रमेशच्या डोक्यात दगडाने मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला.

यानंतर मृतदेह एमएसईबीजवळील सुमारे १०० मीटर अंतरावरील खड्ड्यात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास फैजपूर पोलीस करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add