Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»अजिंठा चौकातील भंगार बाजारावर महापालिकेचा बुलडोझर; पक्क्या अतिक्रमणांवर धडक कारवाई

क्राईम

अजिंठा चौकातील भंगार बाजारावर महापालिकेचा बुलडोझर; पक्क्या अतिक्रमणांवर धडक कारवाई

Editorial DeskBy Editorial DeskSeptember 30, 2026Updated:September 30, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | अजिंठा चौक परिसरातील भंगार बाजारातील पक्क्या अतिक्रमणांवर जळगाव महापालिकेने अखेर धडक कारवाई केली आहे. वारंवार सूचना देऊनही महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण कायम असल्याने प्रशासनाने दोन जेसीबीच्या सहाय्याने थेट अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली.

महापालिकेच्या जागेवर भंगार बाजारासह विविध प्रकारची पक्की बांधकामे करण्यात आल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. संबंधित दुकानदारांना यापूर्वी अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांनंतरही अतिक्रमण कायम राहिल्याने महापालिकेने कठोर पाऊल उचलले.

कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. दोन जेसीबीच्या सहाय्याने पक्की बांधकामे पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारीही कारवाईदरम्यान उपस्थित होते.

महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू करताच काही दुकानदारांनी त्याला विरोध केला. मात्र, प्रशासनाने विरोधाला न जुमानता कारवाई पुढे सुरू ठेवली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अजिंठा चौकातील भंगार बाजारावर झालेल्या या कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमणधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमणांविरोधात प्रशासनाची मोहीम आता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर परिसरातील इतर अतिक्रमणांवरही महापालिका हातोडा चालवणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add