Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»ब्रेकिंग न्यूज : प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा; तरुणाने गळफास घेत संपवले जीवन!

क्राईम

ब्रेकिंग न्यूज : प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा; तरुणाने गळफास घेत संपवले जीवन!

Editorial DeskBy Editorial DeskOctober 6, 2026Updated:October 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | प्रेमसंबंधाला विरोध केल्याने वारंवार धमकावून मानसिक त्रास दिल्याच्या आरोपातून २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील देवळवाडा परिसरात घडली. प्रशांत संजय सोनवणे (वय २८, रा. देऊळवाडा, ता. जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ३ जणांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सोनवणे याची मावस बहीण रोशनी अशोक ठाकरे हिचे संदीप महाजन याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रेमसंबंधाला प्रशांतचा विरोध होता. याच कारणावरून संदीप महाजन, विशाल महाजन तसेच त्यांच्या आईकडून प्रशांतला वारंवार अडवून धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, प्रशांतला रस्त्यात अडवून तसेच विविध ठिकाणी त्रास देण्यात येत होता. या सततच्या त्रासामुळे तो मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता, असा दावा करण्यात आला आहे. अखेर या त्रासाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रशांतने आसोदा उड्डाणपुलाजवळील गवळी मुंजोबा मंदिराच्या मागील शेताच्या बांधावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.

या घटनेनंतर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी केली जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण आणि संबंधित आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

crime crime news Jalgaon
Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add