Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»मोहाडी गावात जुन्या वादातून महिलेचा विनयभंग; पाच जणांविरोधात गुन्हा

क्राईम

मोहाडी गावात जुन्या वादातून महिलेचा विनयभंग; पाच जणांविरोधात गुन्हा

Editorial DeskBy Editorial DeskOctober 8, 2026Updated:October 8, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पाचोरा प्रतिनिधी | पाचोरा तालुक्यातील मोहाडी गावात जुन्या वादातून महिलेसोबत गैरवर्तन करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात विनयभंगासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, घरासमोरील गटारीत नळाचे पाणी सोडल्याच्या कारणावरून हा वाद निर्माण झाला. यावेळी आरोपींनी महिलेसोबत वाद घालत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याच वादातून महिलेच्या मुलीलाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तिचे केस ओढून तिला खाली पाडण्यात आले आणि चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेलाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी राजाराम भाऊ जाधव, विकास राजाराम जाधव, अनिता राजाराम जाधव, सुनाबाई विकास जाधव आणि प्रतिभा राजाराम जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती आहे. पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस करीत आहेत.

accident crime crime news erandol
Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add