Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»गुटख्याने भरलेल्या कारचा निंभोरा फाट्याजवळ अपघात; दोघे जखमी

क्राईम

गुटख्याने भरलेल्या कारचा निंभोरा फाट्याजवळ अपघात; दोघे जखमी

Editorial DeskBy Editorial DeskOctober 8, 2026Updated:October 8, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

रावेर प्रतिनिधी | बुरहानपूरहून महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा घेऊन चोपड्याकडे जात असल्याचा संशय असलेल्या चारचाकी वाहनाला निंभोरा फाट्याजवळ अपघात झाला. या दुर्घटनेत वाहनातील दोन जण जखमी झाले आहेत. (एमएच २६ व्ही ४४२३) क्रमांकाच्या वाहनातून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वाहनातील दोन्ही जखमींना बाहेर काढले. रावेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शरद राजपूत यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी ॲम्बुलन्सच्या मदतीने जखमींना सावदा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृतीनुसार पुढील उपचारासाठी दोघांना जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आढळल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले. त्यामुळे गुटखा वाहतुकीचा संशय बळावला आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा स्रोत आणि वाहतुकीमागील व्यक्तींचा तपास करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणेसमोर आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add