Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»पोलिसांची मोठी कारवाई! दोन वर्षांपासून फरार असलेले जबरी चोरीतील दोन आरोपी अखेर जेरबंद

क्राईम

पोलिसांची मोठी कारवाई! दोन वर्षांपासून फरार असलेले जबरी चोरीतील दोन आरोपी अखेर जेरबंद

Editorial DeskBy Editorial DeskOctober 22, 2026Updated:October 22, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी | जबरी चोरीच्या गुन्ह्यात तब्बल दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन फरार आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अखेर जेरबंद केले आहे. धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली.

जळगाव जिल्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवली.

या मोहिमेदरम्यान पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील दोन आरोपींचा शोध घेण्यात आला. अजय भाईदास धोरात (वय २७, रा. नवलनगर, ता. धुळे) आणि संभाजी बाबू पाटील (वय २६, रा. सातरणे, ता. धुळे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

धरणगाव पोलीस ठाण्यात सन २०२४ मध्ये दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात हे दोघेही आरोपी फरार होते. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोघांनाही धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्याच्या दृष्टीने जळगाव पोलिसांची ही मोहीम महत्त्वाची ठरली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

Breaking News : कर्जाच्या वसुलीसाठी मानसिक छळ: शाळेच्या शिपायाचा भयंकर निर्णय !

October 28, 2026

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटलांची दमदार एन्ट्री; धरणगावच्या सहकार क्षेत्रात नवचैतन्य !

October 28, 2026

विजेचा धक्क्याने खाजगी वायरमनचा दुर्देवी अंत !

October 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add