Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जामनेर तालुक्यात ‘पॅन-इंडिया स्कूल अवेअरनेस’ अंतर्गत विधी जनजागृती सप्ताहाला प्रतिसाद

क्राईम

जामनेर तालुक्यात ‘पॅन-इंडिया स्कूल अवेअरनेस’ अंतर्गत विधी जनजागृती सप्ताहाला प्रतिसाद

Editorial DeskBy Editorial DeskNovember 1, 2026Updated:November 1, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

जामनेर प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार पॅन-इंडिया स्कूल अवेअरनेस प्रोग्राम अंतर्गत जामनेर तालुक्यात २६ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत तालुका विधी सेवा समिती, जामनेर व तालुका वकील संघ, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य विधी सेवा जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

‘सुरक्षित बचपन अभियान’, ‘जागरूकता, सुरक्षा और संरक्षण – हर बच्चे का अधिकार’ आणि ‘हर बच्चे का बचपन, हम सबकी जिम्मेदारी’ या तीन विषयांवर हा सप्ताह आधारित होता.

या अंतर्गत जामनेर तालुक्यातील ६ शाळांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये जि.प. मराठी शाळा खादगाव, कन्या माध्यमिक शाळा वाकी रोड, पी.एम.श्री केंद्र शाळा वाकी रोड, जि.प.उर्दू शाळा बोदवड रोड, जि.प. शाळा वाकी बु. आणि जि.प. शाळा हिवरखेडा बु. यांचा समावेश होता.

*न्यायाधीशांचे मोलाचे मार्गदर्शन*
तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश मा. सौ.उज्वला एस. वानखडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, अनोळखी व्यक्तींना OTP न देणे, गुड टच-बॅड टच, बालविवाह आणि बाल लैंगिक अत्याचार याबाबत अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

यावेळी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. एन. बी. बोराडे यांनी विद्यार्थ्यांना कायद्याचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन केले.

*वकिलांचे आठवडाभर मार्गदर्शन*
संपूर्ण आठवडाभर जामनेर तालुका वकील संघाचे वकील – ॲड. तृप्ती देठे, ॲड. प्रदीप जी. शुक्ला, ॲड. रूपाली चव्हाण, ॲड. हर्षा इंगळे, ॲड. राजू एस. मोरे, ॲड. शिल्पा साळवे यांनी सहा शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलसह कायदेविषयक माहिती दिली.

कार्यक्रमासाठी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. कमलाकर पी. बारी, सचिव ॲड. दिगंबर बी. गोतमारे, तसेच ज्येष्ठ वकील ॲड. अनिल सारस्वत, ॲड. प्रकाश पाटील, ॲड. प्रमोद सोनार, ॲड. अरुण बोरसे, ॲड. रमेश सुरळकर, ॲड. राहुल दाभाडे, ॲड. ज्ञानेश्वर राजपूत, ॲड. सोनाली सुरवाडे, ॲड. समाधान जाधव, ॲड. मिलींद सपकाळे आदींनी विशेष सहकार्य केले.

यावेळी शिक्षणाधिकारी बी. जे. सरोदे व तालुका शिक्षणाधिकारी दळवी, पंचायत समिती व पोलीस स्टेशनचे कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी संदिप सुरवाडे, शिवाजी मालठाणे व पोलीस कर्मचारी चंद्रकांत बोडदे उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

वरणगावात गोळीबाराचा थरार! २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हल्लेखोर फरार, शहरात खळबळ

November 1, 2026

नांद्रीत वाळूच्या डंपरखाली चिरडून एकाचा खून; चौघांविरुद्ध गुन्हा, चालकाला अटक, तिघे फरार!

November 1, 2026

पाचोऱ्यात २५ फुटांचा खड्डा ठरला मृत्यूचा सापळा! विकी निकमचा दुर्दैवी अंत; दोन मित्र जखमी!

November 1, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add